विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पुण्यात राहत्या घरी निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्या कर्करोगानं त्रस्त होत्या. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंनी महत्त्वपूर्ण साथ दिली. प्रगत गणितावर काम करणाऱ्या मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन केली आणि गणित या विषयात त्यांनी एम.ए. केलं. Mangala naralikar death
या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या आणि त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक देखील मिळालं. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी विपूल ग्रंथ लेखन केलं असून ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसं’ हे त्यांचं पुस्तक विशेष गाजलं. तसंच ‘अ कॉस्मिक अॅडव्हेन्चर’ हे अनुवादित पुस्तक अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरलं. ‘गणित गप्पा’, ‘गणिताच्या सोप्या वाटा’, ‘दोस्ती गणिताशी’ अशी लहान मुलांना प्रेरणा देणारी रंजक पुस्तकं देखील त्यांनी लिहिली
Mangala naralikar death
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्याच्या बैठकीला पवार गैरहजर, उद्धव ठाकरे नाराज; संजय राऊत उतरले पवारांच्या समर्थनात!!
- गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांची घेतली भेट; गोड्डा पॉवर प्लांट हस्तांतरित, भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू
- दुटप्पी : विधिमंडळात विरोधकांच्या आंदोलनाला शरदनिष्ठ आमदारांची दांडी; विधानसभेत मुश्रीफांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची!!
- श्रीलंकेने म्हटले- रुपयाचा वापर डॉलरप्रमाणे व्हायला हवा, जर हे कॉमन चलन झाले तर चांगलेच