सकाळी १० वाजता मंदाकिनी खडसे त्यांच्या वकिलासोबत मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या. मात्र, त्या ईडी अधिकाऱ्यांची भेट न घेताच परत माघारी गेल्या.Mandakini Khadse returned without meeting the ED officials
विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवलं होत.त्यामुळे सकाळी १० वाजता मंदाकिनी खडसे त्यांच्या वकिलासोबत मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या. मात्र, त्या ईडी अधिकाऱ्यांची भेट न घेताच परत माघारी गेल्या.
खडसे यांचे वकील मोहन टेकावडे म्हणाले की , “कोर्टाच्या आदेशाने १० ते ५ या वेळेत कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार आम्ही आलो होतो. सकाळी १० वाजता ईडी कार्यालय बंद होतं.साडेदहा वाजता ईडी कार्यालय उघडतं म्हणून आम्ही वाट पाहिली. बहुतेक तपास यंत्रणांना सुट्टी नसते, ती कार्यालयं नेहमी सुरू असतात. आज सुट्टीबाबत काही सूचना नव्हती. कोर्टाच्या आदेशाने मंगळवारी आणि शुक्रवारी जाण्यास सांगितले होते, त्यानुसारच आम्ही आलो होतो. आज भेट झाली नाही, त्यामुळे शुक्रवारी परत येणार आहोत.”
Mandakini Khadse returned without meeting the ED officials
महत्त्वाच्या बातम्या
- IMF ने मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांचे केले कौतुक, एअर इंडियाची विक्री मैलाचा दगड म्हणून उल्लेख
- ‘थोडी सी तो पिली है’ : पोलिसांनी मद्यपी नातेवाइकाला पकडल्याने काँग्रेसच्या महिला आमदाराचा संताप, पोलिसांशी हुज्जत व्हायरल
- सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी 27 ऑक्टोबरला महापंचायत, निहंगांनी आंदोलन सोडण्यावर घेणार जनमत चाचणी
- UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत 40% महिलांना काँग्रेस तिकीट देणार, प्रियंका गांधी यांची घोषणा