• Download App
    ममता - केजरीवाल यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा ठीक; पण त्यांच्या राज्यांमधल्या गोंधळाचे काय?? |Mamata - Kejriwal's national ambitions right; But what about the confusion in their states

    ममता – केजरीवाल यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा ठीक; पण त्यांच्या राज्यांमधल्या गोंधळाचे काय??

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपापल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केल्या आहेत. यातली केजरीवाल यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नवीन नाही, ती 2014 पासून ची जुनी आहे.Mamata – Kejriwal’s national ambitions right; But what about the confusion in their states

    गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून नरेंद्र मोदी यांनी एकदम पंतप्रधान पदावर झेप घेतल्यानंतर ज्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या त्यामध्ये अरविंद केजरीवाल हे पहिले आणि ममता बॅनर्जी या दुसऱ्या आहेत. बाकीच्या मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उफाळल्या नाहीत, असे नाही. पण त्यांची राजकीय कृती मात्र त्या दिशेने झालेली नाही.



    ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सोडून आसाम, त्रिपुरा, मणिपूर, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये दौरे करून आल्या आहेत. अरविंद केजरीवाल हे देखील पंजाब_ उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यांचे दौरे करून आले आहेत. या दोन्ही नेत्यांचे अखंड दौरे सुरू राहणार आहेत.

    आता बॅनर्जी या भाजपवर तोफा डागताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडत आहेत. पण अरविंद केजरीवाल यांच्या मात्र फक्त तोंडीच तोफा “धडपडताना” दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा यांच्या पार्श्वभूमीवर सध्या ते मुख्यमंत्री असलेल्या राज्यांची परिस्थिती पाहिली तर ही महत्त्वाकांक्षा किती फोल आहे हे लक्षात येते. दिल्ली गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने फक्त प्रदूषणाच्या बातम्यांसाठी देशभर चर्चेत आहे. गोपाल राय या पर्यावरण मंत्र्यांवर दिल्लीची जबाबदारी सोपवून अरविंद केजरीवाल इतर राज्यांमध्ये राजकीय दौरे करत आहेत.

    ममता बॅनर्जी यांचे तसे नाही. त्या पश्चिम बंगालची जबाबदारी कोणावर न सोपवतात दिल्ली आसाम, मणिपूर, त्रिपुरा, गोवा या दौर्‍यावर जाताना दिसतात. पश्चिम बंगाल तिथल्या निवडणूक हिंसाचारासाठी चिटफंड घोटाळ्यासाठी, कोळसा घोटाळ्यासाठी आणि ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळेपणािसाठी देशभर चर्चेत असणारे राज्य आहे.

    दिल्लीतले प्रदूषण हे अरविंद केजरीवाल यांनी वाऱ्यावर सोडले आहे, तर पश्चिम बंगाल मधली कायदा आणि सुव्यवस्था ही ममता बॅनर्जी यांनी वाऱ्यावर सोडली आहे. आणि आता हे दोन्ही नेते आपापली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत.

    नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी गुजरातच्या कोणत्या बातम्या चर्चेत होत्या?, तर त्याचे उत्तर “विकासाचे गुजरात मॉडेल” असे आहे. मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर होत असताना किंवा झाल्यानंतर गोध्रा प्रकरण गुजरात दंगल हे विषय केव्हाच मागे पडले होते. या ऐवजी “विकासाचे गुजरात मॉडेल” या विषयाची देशभर चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी गाजली होती.

    याची आठवण आत्ताच निघायचे कारण असे की अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केल्या असताना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये सध्या कोणते विषय प्राधान्याचे आहेत? आणि ती राज्ये नेमक्या कोणत्या विषयासाठी देशभर चर्चेत आहेत?, याचा आढावा घेण्याचे…!! तो घेतल्यावर दिल्ली प्रदूषणासाठी चर्चेत आहे,

    तर पश्चिम बंगाल तिथल्या ढासळलेला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चर्चेत आहे हे लक्षात येते त्यामुळेनरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेतल्या फरकाचा मुद्दा येथे अधोरेखित करावासा वाटतो.

    Mamata – Kejriwal’s national ambitions right; But what about the confusion in their states

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ