विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याची दोन दिवसानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दखल घेऊन सुप्रिया सुळे यांना फोन करून घडामोडींची माहिती घेतली. त्याच्या बातम्या इंग्लिश माध्यमांनी दिल्या, पण मराठी माध्यमांनी मात्र या फोनचे अर्थ वेगळे लावत पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती या नेत्यांनी केल्याच्या बातम्या दिल्या. पण प्रत्यक्षात काय होते?, हे संबंधित नेते, पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच माहिती.Mamata, KCR, Nitish Kumar, kejriwal didn’t pay attention to sharad Pawar retirement politics
पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय पातळीवर पवारांच्या निवृत्ती नाट्याची फार मोठी दखल कोणी घेतल्याचे दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी कोणत्याच प्रादेशिक नेत्याच्या पक्षातंर्गत घडामोडी वर प्रतिक्रिया व्यक्त करणे कधीच शक्य नव्हते आणि नाही.
पण त्या पलीकडे जाऊन विरोधी एकजुटीसाठी जे नेते गेल्या सहा – आठ महिन्यांमध्ये शरद पवारांना सिल्वर ओक वर येऊन भेटून गेले आहेत, त्यापैकी एकाही नेत्याने शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याची साधी दखलही घेऊ नये किंवा त्यावर कमेंट करू नये असे घडले आहे!! पण या मागचे नेमके “राजकीय रहस्य” काय आहे??, हे उलगडले पाहिजे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विरोधकांच्या ऐक्याचे मुखर नेते आहेत. गेल्या सहा – आठ महिन्यांमध्ये हे सर्व नेते पवारांना सिल्वर ओक वर येऊन भेटले आहेत. पवार हे विरोधी ऐक्याचे मार्गदर्शक असल्याचे या सर्वांनी मान्य केले आहे, तरी देखील पवारांच्या निवृत्ती नाट्याला दोन दिवस उलटून गेल्यानंतर यापैकी कोणाही नेत्याने त्या नाट्याची साधी दखलही घेऊ नये, हा मुद्दा विरोधी ऐक्याच्या दृष्टीने कळीचा आहे. या मागचे नेमके “रहस्य” काय आहे हे उलगडायला हवे.
या रहस्यांच्या कारणांपैकी एक कारण पवारांच्या थेट विश्वासार्हतेशी संबंधित आहे. ज्यावेळी विरोधकांचे ऐक्य मजबूत बांधून केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर तुटून पडण्याची गरज आहे, नेमकी तीच राजकीय वेळ साधून पवारांनी राष्ट्रवादीत स्वतःचे निवृत्ती नाट्य घडवून आणले आहे. यात त्यांचे ” “पॉलिटिकल कॅल्क्युलेशन” विरोधकांची एकजूट घडविण्यापेक्षा स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील संभाव्य बंडखोरी थोपवून स्वतःच्या कन्येला राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतेपदी एस्टॅब्लिश करण्याचे आहे.
त्याचवेळी पवार दोन डगरींवर पाय ठेवून उभे असल्याचे चित्र महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उभे राहिले आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्त करायचे आणि दुसरीकडे अजित पवारांना त्यांच्या आमदारांसह भाजपबरोबर साटे लोटे करायला मोकळेक सोडायचे असा दुहेरी राजकीय व्यवहार शरद पवार करत असल्याचा सर्व विरोधी पक्षांना संशय आहे. किंबहुना पवारांची राजकीय विश्वासार्हताच सर्व विरोधी नेत्यांना प्रचंड संशयास्पद वाटते आहे आणि इथेच ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव, नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांनी अद्याप पवारांच्या निवृत्ती नाट्याची दखल घेऊन कोणतीही कमेंट न केल्याचे “राजकीय रहस्य” दडले आहे.
पवारांवर भरवसा ठेवून भाजप विरोधात विशेषत: केंद्रातील मोदी सरकार विरोधात कोणतेही पाऊल उचलणे बाकी सर्व खऱ्या मोदी विरोधकांना धोकादायक वाटत असेल, तर त्याला कारणीभूत विरोधकांच्या संशयापेक्षा पवारांची अविश्वासार्हताच अधिक असल्याचे मान्य करावे लागेल.
विरोधी ऐक्य आळवावरचे पाणी
कारण पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला फार काळ सत्तेबाहेर ठेवून चालणार नाही. अन्यथा ती फुटेल आणि पक्षातले नेतेच आपल्याला सोडून देऊन सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतील, ही भीती पवारांना आहे. त्याच वेळी राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट घडवणे हा तसाही “फ्यूटाइल एक्सरसाइज” आहे. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य या आळवावरच्या पाण्याच्या मागे लागण्यापेक्षा, सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे हे केव्हाही चांगले, असे पवारांना वाटत असेल तर ते त्यांचे “पॉलिटिकल कंपल्शन” आहे.
त्यामुळेच पवार आधी स्वतःचा पक्ष वाचवण्याची खेळी करत आहेत आणि विरोधी ऐक्य जमले तर करू, अशा ते बेतात आहे. त्यामुळे विरोधकांना पवारांच्या कुठल्याच खेळीवर विश्वास ठेवता येणार नाही. त्याचाच परिणाम म्हणून वर उल्लेख केलेले कोणतेही नेते पवारांच्या निवृत्ती नाट्यावर बोलायला तयार नाहीत. ते सावधपणे परिस्थितीवर नजर ठेवून असावेत.
Mamata, KCR, Nitish Kumar, kejriwal didn’t pay attention to sharad Pawar retirement politics
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??
- मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?