नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी मुंबई दौऱ्यावर दाखल होत आहेत. बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य करण्याचा विडा त्यांनी उचलल्यानंतर अनेक छोट्या राज्यांचा दौरा त्यांनी केला. तिथे तृणमूल काँग्रेसची पायाभरणी केली आणि प्रथमच त्या महाराष्ट्राच्या रूपाने मोठ्या राज्याच्या म्हणजे मुंबई दौऱ्यावर येत आहेत.Mamata Banerjee – Uddhav Thackeray is not a gift;Health diet and political diet
येथे येऊन दोन बड्या पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची त्यांची योजना होती. ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्या भेटणार होत्या. आता “होत्या” असेच म्हणावे लागेल कारण ममता बॅनर्जी यांचा हा मुंबई दौरा अर्ध्यावरच राहण्याची चिन्हे आहेत. कारण शिवसेनेच्या सूत्रांनी हे स्पष्ट केले आहे की तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी यांना भेटू शकणार नाहीत.
त्यामुळे फक्त शरद पवार यांच्या भेटी वरच ममता बॅनर्जी यांना समाधान मानावे लागेल. अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत काही आजच बिघडली असेल आहे त्यांच्या मणक्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अर्थातच त्यांच्या तब्येतीसाठी पथ्यपाणी पाळणे देखील आवश्यक आहे. ते तसे पाळत आहेत. ते खरंच घराबाहेर न पडता आवश्यक त्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये ऑनलाइन उपस्थित राहत आहेत. पण आज आणि उद्या होणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यात ते भेटू शकणार नाहीत. हे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पथ्यावरच पडणार आहे. किंबहुना त्यांची बिघडलेली तब्येत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय पथ्यावर पडली आहे.
कारण विरोधी ऐक्यासाठी ममता बॅनर्जी यांची भेट घेणे म्हणजे स्वतःहून त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व मान्य करणे होय, असेच राजकीय वर्तुळात मानण्यात आले असते. आता ही भेट त्या मुंबईला येत आहेत म्हटल्यावर टाळता आली नसती. तसेही उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्या मागच्या मुंबई दौऱ्यात त्यांना भेटले होते. पण तेव्हा फडणवीस सरकार होते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपसरकार मध्ये दुय्यम भूमिकेत होती.
पण आता महाविकास आघाडीमधला दोन आमदारांनी जास्त का होईना पण शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि ममता बॅनर्जी यांना भेटणे हे ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे.
उद्धव ठाकरे यांची क्षमता पंतप्रधानपदाची आहे, असे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे नेहमी सांगत असतात. ममता बॅनर्जी यांची भेट झाली असती तर राऊत यांचे विधान राजकीय विसंगती ठरले असते. त्यामुळे एक प्रकारे तब्येतीच्या कारणास्तव का होईना पण उद्धव ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्याशी भेट होत नाहीये. त्यामुळे बिघडलेली तब्येत उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पथ्यावर पडली आहे असेच म्हणावे लागेल.
शरद पवार तरी भेटतील??
या खेरीज ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. आता उद्धव ठाकरे तर त्यांना भेटणार नाहीतच मग शरद पवार त्यांची भेट घेतील का? त्यासाठी त्या सिल्वर ओकवर जातील की सह्याद्री अतिथीगृहावर भेटतील? की शरद पवार नेहमीप्रमाणे त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलवून भेटून भेट घेतील? अशा शंका राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत. किंबहुना शरद पवार हे त्यांची भेट घेतील की नाही?, अशीच शंका राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा सुरुवातीलाच
Mamata Banerjee – Uddhav Thackeray is not a gift;Health diet and political diet
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांचे मिशन मुंबई सुरवातीलाच अर्ध्यावर!!; तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटू शकणार नाहीत
- महाबळेश्वरला तब्बल १६ वर्षानंतर बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती ; अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न
- सौदी अरेबियाचे पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्सचे बडे कर्ज, पण विचित्र अटींवर!!
- दिल्ली : केजरीवाल यांनी केली कोविड योद्ध्याच्या कुटुंबाला ₹ १ कोटींची मदत , आत्तापर्यंत १८ कोरोना योध्यांना केली मदत