• Download App
    मल्लिकार्जुन खर्गे पाडव्याच्या मुहूर्तावर सूत्रे स्वीकारणार; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा घेणार का पहिला निर्णयMallikarjuna will assume sutras on the occasion of Kharge Padava

    मल्लिकार्जुन खर्गे पाडव्याच्या मुहूर्तावर सूत्रे स्वीकारणार; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा घेणार का पहिला निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे उद्या 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. उद्याच काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठकही राजधानी दिल्लीत अपेक्षित आहे आणि त्या बैठकीत कदाचित मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Mallikarjuna will assume sutras on the occasion of Kharge Padava

    मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे दुसरे नेते खासदार शशी थरूर यांचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. डी. संजीवैय्या यांच्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणारे मल्लिकार्जुन खर्गे हे दुसरे दलित नेते असतील. मल्लिकार्जुन खर्गे यांना गांधी परिवाराचा सुप्त पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच फार मोठ्या फरकाने ते काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवू शकले, अशीही चर्चा आहे.


    Congress : जनतेशी संपर्क तुटल्याची कबुली देत राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर!!


    मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात एक बैठक होणार असून या बैठकीत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार असून त्यामध्ये कदाचित मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

    गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार असताना काँग्रेस महाविकास आघाडीत सामील झाली होती. आजही काँग्रेस औपचारिक रित्या महाविकास आघाडीतच सामील आहे. पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपले बळ स्वतंत्रपणे आजमावण्याचा काँग्रेस निर्णय घेऊ शकते, अशी मुंबईतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हाच पहिला निर्णय होण्याची शक्यता आहे.

    Mallikarjuna will assume sutras on the occasion of Kharge Padava

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट