• Download App
    Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी । Malik V/s Wankhede Maharashtra minister Nawab Malik apologizes in Bombay HC for remarks on Sameer Wankhede's family

    Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी

    Malik V/s Wankhede : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. यानंतर कोर्टात सुनावणी झाली, ज्यामध्ये नवाब मलिक यांनी माफी मागितली आहे. Malik V/s Wankhede Maharashtra minister Nawab Malik apologizes in Bombay HC for remarks on Sameer Wankhede’s family


    वृत्तसंस्था

    मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. यानंतर कोर्टात सुनावणी झाली, ज्यामध्ये नवाब मलिक यांनी माफी मागितली आहे. वानखेडे कुटुंबावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे आश्वासन मलिक यांनी न्यायालयाला दिले होते, मात्र असे असतानाही त्यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर वक्तव्ये केली.

    मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना नोटीस बजावली आणि ज्ञानदेव वानखेडे आणि कुटुंबाविरुद्धच्या विधानांबाबतच्या आधीच्या आदेशांचे स्वेच्छेने उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये, असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले, तत्पूर्वी त्यांनी न्यायालयात सांगितले होते की, असे करणार नाही.

    काय आहे प्रकरण?

    एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर मलिक यांनी याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वानखेडे कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्ये करणार नाही असे सांगितले होते.

    ज्ञानदेव वानखेडे यांनी 6 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी न्यायालयात हमीपत्र देऊनही आपल्या कुटुंबाविरुद्ध वक्तव्ये करत राहिल्याने त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप केला. यावर आज मलिकांनी हायकोर्टात माफी मागितली आहे.

    Malik V/s Wankhede Maharashtra minister Nawab Malik apologizes in Bombay HC for remarks on Sameer Wankhede’s family

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला