• Download App
    उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला|Malegaon factory's civil court rejects claim for damages

    उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला

    माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील कोळेकर वस्ती परिसरात वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या पिकाला आग लागली होती.Malegaon factory’s civil court rejects claim for damages


    विशेष प्रतिनिधी

    बारामती : माळेगावमध्ये उसाला आग लागली होती.ही आग विझविण्यासाठी अग्निशामक गाडी पाठवण्यात आली होती.आग विझवताना अग्निशामक गाडीला आग लागली.त्यामुळे गाडी जळून खाक झाली.तिच्या नुकसान भरपाईसाठी केलेला सहकारी साखर कारखान्याचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला.

    माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील कोळेकर वस्ती परिसरात वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या पिकाला आग लागली होती. ती विझविण्यासाठी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी पाठविण्यात आली.



    परंतु, वाऱ्याच्या वेगाने आग पसरल्यामुळे गाडीला देखील आग लागली होती. कारखान्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बारामती यांच्याविरुद्ध १२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल केला होता.

    कारखान्याने या गाडीचा इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता.दरम्यान विमा कंपनीला कारखानदार आरटीओने दिलेले अपघाताच्या दिवशीचे फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. तसेच, पूर्वीच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपलेली होती.

    याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर वाहन चालविण्यासाठी असलेले परमीट अस्तित्वात धरले जात नाही, असा निष्कर्ष काढत न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी. एन. अरवड यांनी हा दावा फेटाळला.

    Malegaon factory’s civil court rejects claim for damages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pankaja Munde : मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये; OBC उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका

    Manoj Jarange : छगन भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी, ते नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे, मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर निशाणा

    Chhagan Bhujbal : OBC उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक; मराठा समाजाला जास्त निधी दिल्याचा आरोप; कुणबी नोंदींच्या GR वरही घेतला आक्षेप