विशेष प्रतिनिधी
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उद्या सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. एक हजार मूर्ती घरोघरी देण्यात आल्या आहेत. Making a thousand idols of Shivaji Maharaj and giving them to women from house to house; Innovative activities for the anniversary
घरात कुटुंबासह शिवजन्मोत्सव साजरा करता यावा यासाठी चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक हजार मुर्ती तयार केल्या. मुर्तीची घरातही प्रतिष्ठापना करता यावी म्हणून हळदी कुंकवासह सुवासिनींच्या हाती सोपविल्या.
शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो. मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला.
विशेष म्हणजे फफाळ कुटुंबातील पांडुरंग यांच्यासह त्यांची आई,पत्नी आणि मुलांनी रात्रंदिवस जागून या मुर्ती बनवल्या आहेत. कोणतेही शुल्क न घेता केवळ छत्रपतींचा विचार घराघरात पोहचावा या उदात्त हेतूने फफाळ कुटुंबाने हा उपक्रम राबवला आहे.
Making a thousand idols of Shivaji Maharaj and giving them to women from house to house; Innovative activities for the anniversary
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या मूकसंमतीने अखेर मालेगावातील उर्दू घराला “हिजाब गर्ल” मुस्कान खानचे नाव!!
- ANIL AGRAWAL : इ है मुंबई नगरीया तू देख बबुआ …! Vedanta group चे अनिल अग्रवाल सांगतात मुंबईच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा हातात जेवणाचा डबा अन् चादर होती
- सावरकर चरित्रकार विक्रम संपथ यांच्याविरुद्ध डाव्यांचे षडयंत्र; दिल्ली हायकोर्टाने घेतली दखल!!
- संगीत नाट्य स्पर्धेचे आता नवे नामकरण ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’