• Download App
    सुनेत्रा पवारांना खासदार करून महायुतीत अजितदादा "लाभार्थी"; पण अजितदादांचा महायुतीला फायदा की तोटा??, वाचा आकडेवारी!! Major upset from ajit pawar's NCP to BJP and shinde shivsena in loksabha elections

    Ajit Pawar : सुनेत्रा पवारांना खासदार करून महायुतीत अजितदादा “लाभार्थी”; पण अजितदादांचा महायुतीला फायदा की तोटा??, वाचा आकडेवारी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या, तरी देखील अजित पवारांनी त्यांना लगेच राज्यसभेवर घेतले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारच (Ajit Pawar) खरे “लाभार्थी” ठरले, पण प्रत्यक्षात महायुतीतल्या इतर घटक पक्षांना अजित पवारांच्या महायुतीतल्या अस्तित्वामुळे फायदा झाला की तोटा झाला??, हे आकडेवारीतून समोर आले. Major upset from ajit pawar’s NCP to BJP and shinde shivsena in loksabha elections

    लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भाजप तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील उमेदवार पिछाडीवर पडले होते. त्यामुळेच आता महायुतीमध्ये दोन पक्षांना एकत्रितपणे बहुमत असताना तिसऱ्या पक्षाच्या गरजेसंदर्भात महायुतीमधील इतर दोन पक्षांतील नेतेच प्रश्न उपस्थित केले. महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पक्षाची मते भाजप, तसेच शिंदे गटाला ट्रान्सफर न झाल्याने ही नाराजी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांची महायुतीत गरजच काय??, या संदर्भात आता भाजपामधील काही नेत्यांनी दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    अजित पवार नको म्हणून दबाव

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास अजित पवार गटाचे आमदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर गेले. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी मतदारसंघांचा समावेश आहे. मावळमधून जिंकलेले शिंदेंच्या गटाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटाने आपल्याला सहकार्य केले नसल्याची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. असाच अनुभव इतरांचाही असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचा विचार करता अजित पवारांना महायुतीबरोबर ठेवावे की नाही याचा फेरविचार पक्षनेतृत्वाने करावा यासाठी भाजपा आणि शिंदे गटातील प्रभावशाली नेते नेतृत्वावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. थेट आकडेवारीचा आधार घेत महायुतीला अजित पवारांचा फायदा होत नसल्याचा या दबाव आणणाऱ्या नेत्यांचा दावा आहे.



    वाचा आकडेवारी

    सोलापूरमध्ये भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राम सातपुते पराभूत झाले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी त्यांचा 74000 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असलेल्या यशवंत माने यांच्या मतदारसंघात सातपुते 63000 पेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर पडले. तसेच शरद पवार गटाच्या धौर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यात मोठा विजय मिळवला. इथं त्यांना भाजपाच्या रणजितसिंह मोहिते पाटलांना पराभूत केलं. रणजितसिंह 1 लाख 20 हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार असून त्यांच्या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवाराने 41000 हून अधिकचे मताधिक्य मिळवले.

    केंद्रीय मंत्र्यांनाही फटका

    अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघांचा फटका थेट केंद्रीय मंत्र्यांना बसल्याचा दावाही केला जातोय. दिंडोरीमध्ये मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या डॉ. भारती पवार पराभूत झाल्या. त्यांचा 1 लाख 13 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. या लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे 4 आमदार असूनही त्याचा भाजपाच्या उमेदवाराला फायदा झाला नाही. चारही आमदारांच्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर राहिल्या. भुजबळांच्या मतदारसंघातही भारती पवार 13000 मतांनी पिछाडीवर पडल्या. अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ आमदार असलेल्या दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी 82000 लीड मिळवले.  त्यामुळे आकडेवारीतून तरी अजित पवार गटाचा महायुतीला फायदा झाला नाही, तर उलट तोटाच झाला हेच समोर आले.

    Major upset from ajit pawar’s NCP to BJP and shinde shivsena in loksabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल