विशेष प्रतिनिधी
मुंबई : जागतिक वारसा स्थळासाठी ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ व ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे.Major forts will proposed for UN heritage sight
त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाने जागतिक वारसा स्थळाचे नामाकंन मिळवण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावात रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी या कातळशिल्पांचा समावेश केला आहे.
‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन यावर्षी युनेस्कोतर्फे जागतिक वारसा दिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने तयार केलेले हे प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सादर करण्यात आले होते.
या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला असून जागतिक वारसा स्थळांसाठी युनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास या नामांकनामुळे मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. तसेच, कोकणात आजपर्यंत केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात पर्यटन होत होते. कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटकही कोकणाकडे वळतील. त्यामुळे स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल.
Major forts will proposed for UN heritage sight
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू
- Bajaj Chetak : अरारारा खतरनाक! बुलेटपेक्षा महाग झाली बजाजची चेतक स्कूटर, असे आहेत भन्नाट फीचर्स
- इंडिगो, विस्तारासह 4 विमान कंपन्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची तयारी, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांची केली नव्हती कोरोना टेस्ट
- कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त 40% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ….
- मोठी बातमी : आता Oxygen Express Trains चालवणार रेल्वे, ग्रीन कॉरिडोर बनवून करणार वेगवान पुरवठा