• Download App
    Major cracks appeared in MVA after loksabha polls success

    बारामतीत दादा बदल, राष्ट्रवादीत अध्यक्ष पदाची खदखद, काँग्रेस – शिवसेनेच्या दंडात शिरले “स्व”बळ!!

    नाशिक : बारामतीत दादा बदल, राष्ट्रवादीत अध्यक्षपदाची खदखद आणि काँग्रेस – शिवसेनेच्या दंडामध्ये शिरले “स्व”बळ!!, अशी लोकसभेतल्या यशानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची अवस्था बनत चालली आहे. Major cracks appeared in MVA after loksabha polls success

    लोकसभा निवडणुकीपुरती महाविकास आघाडी एकजिनसी होती. जागा वाटपाच्या किरकोळ कुरबुरी वगळल्या, तर ठाकरे, पवार आणि नाना पटोले यांनी सामंजस्याने जागावाटप करून सभेची निवडणूक लढवली. त्याचे फळ त्यांना मिळाले. महाविकास आघाडीला एकत्रित 31 जागा मिळाल्या. त्यांनी महायुतीवर मात केली. विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी पाहिली तर ती 150 वर पोहोचली. यातूनच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना महत्त्वाकांक्षांचे धुमारे फुटले. काँग्रेस आणि शिवसेना यांच्या दंडांमध्ये “स्व”बळ शिरले. दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातल्या 288 जागा लढवण्याची स्वप्ने पडू लागली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तशी उघड वक्तव्ये केली. यातून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.



    विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी परस्पर नाशिक मधून उमेदवार दिला त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चिडले उद्धव ठाकरेंनी आपले फोनच घेतले नाही त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय राहिला नसल्याची प्रतिमा तयार झाली, अशा शब्दांत नानांनी चिडचिड व्यकठाकरेंनी लंडनमध्ये असताना फोन घेतले, पण मुंबईत असताना फोन घेतले नाहीत, असे नाना म्हणाले.

    पण हे फक्त काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाबतीत राहिले नाही. खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वादाला धुमारे फुटले ते नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसने नगर लोकसभेची जागा सुजय विखे पाटलांना पाडून जिंकल्याने पक्षाच्या दंडांमध्ये बळ शिरले. त्यांनी त्या बळाचे नगरमध्ये शक्तिप्रदर्शन केले. मात्र या शक्तिप्रदर्शनातच पक्षांतर्गत बेबनाव खुद्द शरद पवार यांच्यासमोरच दिसला. जयंत जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला. शरद पवारांच्या नेतृत्वामुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले, पण काही नेते रात्रीच्या अंधारात समोरच्यांची पॅचअप करायला जात होते. त्यांनी एक तर इकडे राहावे किंवा तिकडे निघून जावे, अशा आशयाची पोस्ट रोहित पवारांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिली होती. त्याचा त्यांनी नगर मधल्या भाषणात पुनरुचार देखील केला. तो अर्थातच जयंत पाटलांना उद्देशून असल्याचे सगळ्यांना माहिती होते.

    जयंत पाटलांनी देखील रोहित पवारांना परखड शब्दांमध्ये तिथेच उत्तर दिले. पक्षातले वाद बाहेर चव्हाट्यावर आणायचे कारण नाही. ज्या काही तक्रारी असतील, त्या पवार साहेबांकडे करा. पवार साहेब आम्हाला द्यायच्या, त्या कानपिचक्या देतील. यासाठी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वाटेल ती वक्तव्य करण्याची गरज नाही, असा इशारा जयंत पाटलांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटलांकडून काढून साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्या टीमकडे पक्षाचे काम सोपवावे, अशी मागणी रोहित पवारांच्या समर्थकांनी सोशल मीडिया अकाउंट वरूनच केली होती. या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी पवारांसमोरच राग व्यक्त केला. त्यामुळे विजयाच्या सेलिब्रेशन मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे जनतेसमोर उघड झाले.

    Major cracks appeared in MVA after loksabha polls success

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस