• Download App
    मोठा अपघात टळला : मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग । Major accident averted Alliance Air's engine crashes after taking off from Mumbai, emergency landing at Bhuj

    मोठा अपघात टळला : मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

    Alliance Air’s engine crashes : बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर धावपट्टीवर पडले, मात्र काही वेळाने याची माहिती मिळाल्यानंतर ते भुजमध्ये तातडीने सुरक्षित उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंजिनचे वरचे कव्हर कसे पडले याची चौकशी सुरू केली आहे. Major accident averted Alliance Air’s engine crashes after taking off from Mumbai, emergency landing at Bhuj


    वृत्तसंस्था

    मुंबई : बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर धावपट्टीवर पडले, मात्र काही वेळाने याची माहिती मिळाल्यानंतर ते भुजमध्ये तातडीने सुरक्षित उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंजिनचे वरचे कव्हर कसे पडले याची चौकशी सुरू केली आहे.

    मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) ने ही माहिती दिली. मुंबई विमानतळावरील एका सूत्राने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अलायन्स एअर मुंबईहून भुजला उड्डाण करणार होते, त्याचवेळी विमानाचे इंजिन कव्हर धावपट्टीवर पडले आणि इंजिन कव्हरशिवाय उड्डाण केले. याशिवाय डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, विमान भुज विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि एअरलाइन्सविरोधात चौकशी सुरू झाली आहे. मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (एटीसी) याबाबत माहिती दिली.

    उड्डाण तज्ञांच्या मते, या घटनेचे कारण खराब देखभाल असू शकते. ते म्हणाले की, जर कुंडी सुरक्षित नसेल तर सामान्यतः देखभाल कामानंतर काऊल डिटेचमेंट होते. उड्डाण सुरू होण्यापूर्वी चालक दलाने हे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे की, इंजिन काउल नीट आहे की नाही.

    Major accident averted Alliance Air’s engine crashes after taking off from Mumbai, emergency landing at Bhuj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार