२० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या मार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ एक खासगी बस पहाटे चार वाजता दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार सात ते आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत. Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway
या बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बस पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाली होती, दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य तातडीने युद्धपातळीवर सुरू झाले.
प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत २५ प्रवाशांना दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर अद्यापही जवळपास १५ पेक्षा अधिक प्रवासी अडकलेले आहेत.
Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…