नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड बिहार विधानसभा निवडणुकीत तुटले. पण हे रेकॉर्ड कुठल्या घराणेशाही नेत्याने तोडले नाही, तर बिगर घराणेशाही बिहारी मुलीने ते रेकॉर्ड तोडून टाकले. Maithili Thakur
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आर. आर. आबा पाटलांची घराणेशाही पुढे चालवत तासगाव मधून त्यांचा मुलगा रोहित पाटलाला तिकीट दिले होते. रोहित पाटील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले, त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षे 4 महिने 16 दिवस एवढे होते. बिहारमध्ये भाजपची उमेदवार आणि लोकगायिका मैथिली ठाकूरने अलीपूर मधून निवडणूक जिंकली, त्यावेळी म्हणजे 14 नोव्हेंबर 2025 रोजी तिचे वय 25 वर्षे 3 महिने 20 दिवस एवढे होते. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आबा पाटलांच्या घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड बिहार मधल्या बिगर घराणेशाही मैथिली ठाकूरने तोडून टाकले. संपूर्ण देशात ती सगळ्या कमी वयाची आमदार ठरली.
तासगाव मध्ये सुद्धा हे रेकॉर्ड झाले नसते पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आबा पाटलांची घराणेशाही पुढे चालून रोहित पाटलाला तिकीट दिले त्यामुळे ते रेकॉर्ड बनले होते.
त्याउलट मैथिली ठाकूरच्या घराण्यात ना कोणी आमदार बनले होते, ना कोणी खासदार बनले होते. ती एक सामान्य घरातली मुलगी. आपल्या लोकगायकीच्या तिने लोकप्रियता मिळवली. तिच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला झाला. भाजपने तिला तिकीट देऊन अलीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले. तिने राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा 11000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
– झिशान सिद्दिकी आणि तेलंगणातला रोहितही तरुण आमदार
ऐन पंचविसाव्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील आणि मैथिली ठाकूर हे काही एकमेव तरुण आमदार नव्हते त्यांच्या आधी महाराष्ट्रात झिशान सिद्दिकी 26 व्या वर्षी आमदार बनले त्याचबरोबर तेलंगणातले रोहित हे देखील 26 आमदार बनलेत. पण या दोघांचीही पार्श्वभूमी घराणेशाहीचीच ठरली. मैथिली ठाकूर वगळता बाकी सगळे तरुण आमदार घराणेशाहीचा आधार घेऊनच विधानसभेत पोहोचले.
Maithili Thakur record break Rohit Patil
महत्वाच्या बातम्या
- Indian Army : सैन्याने 16,000 फूट उंचीवर मोनोरेल चालवली; गजराज कॉर्प्सने उभारली; अरुणाचलच्या पर्वतीय भागात पोहोचेल मदत
- काँग्रेस फुटण्याआधी लालूंचेच कुटुंब तुटले; लालूंना किडनी देणाऱ्या कन्येने राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडले!!
- Karnataka : कर्नाटकात ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; 100 हून अधिक ट्रॅक्टर जाळले; ऊसाला प्रति टन 3,500ची मागणी
- BBC : BBCने ट्रम्प यांची माफी मागितली, भरपाई नाकारली; म्हटले- राष्ट्रपतींचे नुकसान नाही; ₹8,400 कोटींची होती नोटीस