विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने यंदाचा गोदा जीवन गौरव पुरस्कार जलतज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना घोषित करण्यात आला आहे. दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी गोदा आरती नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दैनंदिन गोदा आरती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. समितीच्या वतीने गेल्या वर्षापासून गोदा जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी समितीच्या वतीने पाणी विषयातील तज्ञ अभ्यास पद्मश्री महेश शर्मा यांना गोदा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जाणार आहे. त्यानुसार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी खिमजी भगवान धर्मशाळा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०८ वैदिकांच्या उपस्थितीत वेद पारायण संपन्न होणार आहे.दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी गोदा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. तर दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी गोदासेवकांची ऋषिकेश आणि हरिद्वार येथे अभ्यास सहल काढण्यात येणार आहे.
– पद्मश्री महेश शर्मा यांचा परिचय
मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झांबुआ जिल्ह्यातील रहिवाशी असलेले पद्मश्री महेश शर्मा यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. जलतज्ञ असलेल्या महेश शर्मा यांनी नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन काम केले. जल व्यवस्थापन करून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित तरुण प्रशिक्षण देत जैविक शेतीला प्रोत्साहन दिले. शिवगंगा संस्थेच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर लढा देत त्यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणले. सामाजिक क्षेत्रातील या त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे.
Mahesh Sharma got Godawari Seva samiti award
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार बोलले असतील तर त्यात गैर नाही, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना सुनावले
- पुण्यातील सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन
- Hussain Dalwai शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर संकट, हुसेन दलवाई यांनी टीका
- MRSAM : नौदलाला MRSAM क्षेपणास्त्रे मिळणार, भारत डायनॅमिक्ससोबत २,९६० कोटींचा करार