• Download App
    Mahesh Kothare Mumbai Mayor BJP Sanjay Raut Tatya Vinchu Jibe Controversy महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल;

    Mahesh Kothare : महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल; संजय राऊत म्हणाले – तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल!

    Mahesh Kothare

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mahesh Kothare  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.Mahesh Kothare

    महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे.Mahesh Kothare



    विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

    तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत

    महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असे संजय राऊत मंगळवारी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

    असीम सरोदे यांचीही टीका

    ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनीही या प्रकरणी महेश कोठारे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. इंदिरा गांधींची घोषित आणीबाणी देशात लागू करण्यात आली तेव्हा अनेक अभिनेते, गायक, लेखक, चित्रकार,कवी, वकील, न्यायाधीश त्यांच्या विरोधात होते. ते सत्य बोलायला पुढे आले,जाहीरपणे इंदिरा गांधींच्या विरोधात बोलल्याने अनेकजण तुरुंगात गेले. पण आज उलटेच आहे. अघोषित आणीबाणी व लोकशाहीवरील अतिगंभीर हल्ला होतोय पण अनेक अभिनेते, गायक, लेखक, चित्रकार,कवी, वकील, न्यायाधीश, पोलीस नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने बोलतायत. सत्तेसमोर लोटांगण घातले जातेय डॅम इट, असे ते म्हणालेत. ‘डॅम इट’ हा महेश कोठारे यांचा चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग आहे.

    महेश कोठारे आपल्या विधानावर ठाम

    संजय राऊत यांच्या टीकेनंतर महेश कोठारे यांनी आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. मी त्यांचा आदर करतो. पण माझे मत हे माझे मत आहे. मी माझे मत मांडले. मी त्यावर ठाम आहे. माझे मत निर्विवाद आहे. मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. यात राजकारणात आणण्याचा संबंधच येत नाही, असे ते म्हणाले.

    Mahesh Kothare Mumbai Mayor BJP Sanjay Raut Tatya Vinchu Jibe Controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नको लालू, नको ठाकरे बंधू; एकटेच लढू अन् जोरदार पडू!!

    Eknath Shinde : असीम सरोदे यांचा दावा- एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य; ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर मजबूत

    Pune : पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी, हवामान खात्याचा अंदाज