विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा हुरूप वाढला, पण लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन सर्वेक्षणांमधून मात्र महायुतीसाठी गुड न्यूज, तर महाविकास आघाडी मसाठी बॅड न्यूज आली. टाइम्स नाऊ – मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात “हंग असेंब्ली” येणार असली, तरी भाजपच 1 नंबर वरचा पक्ष ठरल्याचा निष्कर्ष निघाला, तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष पूर्ण घरंगळल्याचा निष्कर्ष मतदारांनी काढला. Mahayuti win in AI suvey
त्या पलीकडे जाऊन झी 24 तासने केलेल्या पहिल्या AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा इम्पॅक्ट दिसला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जो फायदा मिळाला, तो सगळा विधानसभा निवडणुकीपूर्वी संपुष्टात येणार असल्याचा निष्कर्ष AI सर्वेक्षणाने काढला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास दुणावला, तर दुसरीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत महिला वर्गास आपलसं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असेच दिसून येते. लोकसभेला महायुतीचा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने विधानसभेचं चित्र काय असेल??, असा प्रश्न सर्वांनाच पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा पहिला AI सर्व्हे समोर आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरू शकते का??, मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची कोणाला पसंती आहे??, राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल??, या प्रश्नांची उत्तरे जिनिया AI सर्वेक्षणातून समोर आली. या AI सर्वेक्षणातून राज्यातील लाखो लोकांची मते जाणून घेतली.
यात 47 % लोकांनी भाजप नेतृत्त्वातील महायुतीला फायदा होईल, असा कौल दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता??, असा प्रश्न विचारला असता विकासाच्या मुद्द्यावर 25 % लोकांनी कौल दिला असून 20 % लोकांनी कल्याणकारी योजनेबाबत आपलं मत मांडलं. तर, राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 10 % लोकांनी विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं भाष्य केले. तसेच, 15 % नागरिकांनी बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटले. तर, भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावरही अनुक्रमे 15-15 % लोकांनी कौल दिला.
कोण बनवणार सरकार?
कोणता पक्ष महाराष्ट्रात सरकार बनवू शकतो, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारला असता, 38 % लोकांनी भाजपला पसंती दिली, तर 22 % लोकांनी शिवसेना शिंदे गटाला मत दिले, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17 % लोकांनी मत दिले आहे. या सर्व्हेक्षणात 14 % जनतेनं काँग्रेसला पसंती दिली असून केवळ 9 % लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पहिल्या क्रमाकांची पसंती दिली.
Mahayuti win in AI suvey
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!