विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाच वर्षांपासून प्रशासक आहेत. ओबीसींना २०२२ पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चार आठवड्यांच्या आता निवडणुकांसदर्भातील अधिसूचना काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
श्री क्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालाने दिलेल्या निर्णयाचा आनंद आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की, तत्काळ यासंदर्भात सगळी तयारी करावी निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य केली आहे.
फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींचे पूर्ण आरक्षण लागू असणार आहे. याचेही आम्ही मनापासून स्वागत करतो.
Mahayuti will contest local elections together, says Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?
- Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाण
- Rajnath Singh संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला इशारा, म्हणाले…
- Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू