• Download App
    Mahayuti Wins 22 Seats Unopposed Before Polling in Maharashtra ZP Elections मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! तब्बल 22 उमेदवार बिनविरोध, कोकणातून उघडले विजयाचे खाते

    Mahayuti : मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! तब्बल 22 उमेदवार बिनविरोध, कोकणातून उघडले विजयाचे खाते

    Mahayuti

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mahayuti  राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम लढतींचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, राजकीय आखाड्यात खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून, सर्वच पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.Mahayuti

    दुसरीकडे, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने कोकणात जोरदार मुसंडी मारत विजयाचे खाते उघडले आहे. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तब्बल 21 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या सवाने धामणे गणातून महायुतीचे अनिल जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे महायुतीचे एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवण्यापूर्वीच विजयी झाले असून, या यशामुळे सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.Mahayuti



    सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे 19 तर शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद मध्ये खारेपाटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी घाडी, बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली, कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे, किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध झाल्या आहेत. तर, जाणवली जिल्हा परिषद उमेदवार रुहिता तांबे या शिंदेंच्या शिवसेना उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या आहेत.

    तसेच पंचायत समितीमध्ये भाजपचे बिडवाडी पंचायत समिती संजना राणे, वरवडे पंचायत समिती सोनू सावंत, कोकीसरे पंचायत समिती साधना नकाशे, पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल, नाडण पंचायत समिती गणेश राणे, बापर्डे पंचायत समिती संजना लाड, नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ, नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके, शिरगाव पंचायत समिती शीतल तावडे, फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण, जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण, आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर, आसोली पंचायत समिती संकेत धुरी हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

    ठाकरे गटाच्या उमेदवारांची माघार आणि शिंदे गट बिनविरोध

    तर दोडामार्ग तालुक्यातील कोळझर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण परब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गवस यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. गणेशप्रसाद गवस हे सध्या शिंदे गटाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असून, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे कोळझरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

    रायगडमध्ये शिंदे गटाची पहिली उमेदवारी बिनविरोध

    रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिवसेना शिंदे गटासाठी विजयाचे शुभ संकेत मिळाले असून, सवाने धामणे पंचायत समिती गणातून अनिल जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने जाधव यांचा विजय सुकर झाला. या यशामुळे शिंदे गटाने रायगडमध्ये विजयाचे खाते उघडले असून, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढे भरवून या विजयाचा जल्लोष साजरा केला.

    Mahayuti Wins 22 Seats Unopposed Before Polling in Maharashtra ZP Elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Satara Gazetteer : ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार; मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातील बैठकीत आरक्षणाचा आढावा

    Girish Mahajan : अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका, प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

    Bombay High Court : हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार; प्रदूषणाची सर्व आकडेवारी सार्वजनिक करण्याचे मुंबई HCचे आदेश