• Download App
    Devendra fadnavis फडणवीसांची कुणावरही नाही टीका; युती तुटायची वाट बघणार्‍यांनो, डोळे उघडून बघा!!

    फडणवीसांची कुणावरही नाही टीका; युती तुटायची वाट बघणार्‍यांनो, डोळे उघडून बघा!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीतले सगळे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांनी विरोधात उभे राहिले तिथे सगळ्यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणावरही टीका करायचे टाळले. त्यांनी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यांवर भाषणे करत जनतेकडे मते मागितली. यातून एक मोठा राजकीय संदेश त्यांनी जनतेबरोबरच मराठी माध्यमांना नाही दिला पण “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना त्यातला राजकीय संदेश समजूच शकला नाही.

    दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. तेवढ्या एका किरकोळ वक्तव्याची काडी हातात धरून मराठी माध्यमांनी आणि विरोधकांनी युती तुटायची मोठी माडी बांधली. जणू काही युती टिकवायची आणि युती तोडायची हा निर्णय घेणे एकमेव नेते असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याच हातात आहे आणि ते म्हणतील तर म्हणाले तर युती टिकेल आणि ते म्हणाले नाहीत तर युती मोडेल, असा आव मराठी माध्यमांनी आणला. जो बिलकुल खरा नव्हता. त्याचबरोबर “पवार बुद्धीच्या” मराठी विश्लेषकांनी महाराष्ट्रात भाजपची एकपक्षीय राजवट येईल, याची भीती दाखविली.



    – फडणवीसांच्या प्रचारसूत्राकडे माध्यमांचे दुर्लक्ष

    पण हे सगळे करताना मराठी माध्यमांनी फडणवीसांच्या भाषणांकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व विभागांच्या शहरांमध्ये प्रचारसभा घेतल्या. त्या सभांमध्ये त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली त्यांनी कुठेही महायुतीतल्या मित्रपक्षांवर किंवा विरोधकांवर टीकेचा शब्दही उच्चारला नाही. मला सकारात्मक मुद्द्यांवर मतं मागायची आहेत असे त्यांनी प्रत्येक जाहीर सभेत सांगितले. प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला. मी कुठेही विरोधकांवर टीका केली नाही. मित्रपक्षांवर टीका करायचा प्रश्नच उद्भवत नाही. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांनी मेहनत करावी, अशी त्यांची अपेक्षा असेल, तर ती नेत्यांनी पूर्ण केली पाहिजे, असे वक्तव्य करून फडणवीसांनी सगळ्या महाराष्ट्राला मोठा राजकीय संदेश दिला.

    – युती नाही तुटणार

    2 डिसेंबर नंतर निकाल काय लागायचे ते लागोत, महायुती तुटणार नाही. कुठलेही घटक पक्ष इकडे तिकडे जाणार नाहीत. कुणीही काही म्हणो, विरोधकांना आणि “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना जे वाटते ते घडणार नाही, हाच तो संदेश होता.

    Mahayuti to remain intact, asserts Devendra fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : नकली को किया ढेर, UBT को पता चला कौन असली शेर; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन