विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी समोर अब की बार 400 पार असे ध्येय ठेवून त्याची जाहीर घोषणा केली असताना महाराष्ट्रातून त्यात मोठा वाटा देता यावा म्हणून भाजप + शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्रात 45 पारचा नारा दिला, पण त्यावर कुरघोडी करताना महाविकास आघाडीच मात्र 32 – 33 वरच अडकली. म्हणजे भाजप + सेना नेते म्हणतात अब की बार 45 बार, पण महाविकास आघाडीची गाडी 32 – 33 वरच गार!!, अशी स्थिती आली. Mahayuti targets 45 + seats in maharashtra, MVA falling short on 32 – 33 seats!!
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे झाले. ते निवडणूक होईपर्यंत सुरूच राहणार आहेत. या दौऱ्यांमधल्या प्रत्येक भाषणात मोदी आणि शाह अब की बार 400 पारच्या घोषणा देतात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात 45 पारची घोषणा देतात. त्यांच्या या घोषणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील आपापल्या भाषणांमधून रिपीट करतात. त्यादृष्टीने महायुतीची रणनीती देखील काम करताना दिसते. वेगवेगळ्या मतदारसंघांमधल्या छोट्या – मोठ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करत नेत्यांना जोडून घेऊन मतदारांसाठी जमिनीत स्तरावर काम करण्याचे रणनीती सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दक्षिण महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करून आपले जुनेच सहकारी आपल्या भोवती गोळा केले आहेत. विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे या आपल्याच पिढीतल्या वयोवृद्ध नेत्यांना पवारांनी आपल्या गोटात घेतले. साताऱ्यातल्या आजच्या पत्रकार परिषदेत पवारांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 60 ते 70 % जागा निवडून येतील, असा दावा केला. याचा अर्थ पवारांनी महाविकास आघाडी 30 ते 35 जागांवरच जिंकेल, असे गृहीत धरल्याचे दिसते.
शरद पवारांच्या या आकडेवारीला जयंत पाटलांनी सांगलीतून दुजोरा दिला. महाविकास आघाडीतल्या जुन्या मतभेदांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. वर वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील एकत्र बसून चहा घेत असतील. आपण खाली उगाच मतभेदांचा बाऊ करण्यात मतलब नाही, असे सांगून जयंत पाटलांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रात 32 – 33 जागा जिंकेल, असा दावा केला. लोकसभेत निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागणार आहे, पण निदान त्याचे ध्येय महायुतीच्या नेत्यांनी 45 पारचे तरी ठेवले आहे, उलट महाविकास आघाडीची गाडी मात्र 32 – 33 वर गार पडलेली दिसत आहे!!
Mahayuti targets 45 + seats in maharashtra, MVA falling short on 32 – 33 seats!!
महत्वाच्या बातम्या
- काकांच्या बेरजेच्या राजकारणात वजाबाकी कुणाची?? भाजप – सेनेची की पुतण्याची??
- इस्रायल आणि इराणमध्ये भयानक युद्ध सुरू होण्याच्या शक्यतेवर UNचे मोठे विधान, म्हटले ‘जग आता…’
- राहुल गांधींविरोधात वायनाड मध्ये प्रचंड संताप; कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार एनी राजा यांचा दावा
- ”आता आम्ही आणखी हल्ले करणार नाही, मात्र इस्रायल…” हल्ल्यानंतर इराणने जारी केले निवेदन