• Download App
    Mahayuti MLA Sanjay Gaikwad Claims No Funds आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही;

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad : आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही; लोकप्रिय योजनांचा फटका, संजय गायकवाड यांचा दावा; मंत्री सरनाईकांनी फेटाळला

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mahayuti MLA Sanjay Gaikwad महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.Mahayuti MLA Sanjay Gaikwad

    महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याची चर्चा आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. महायुती सरकारची ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी असली तरी ती चालवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकार कोणत्या ना कोणत्या विभागाचे पैसे वळवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदारांना निधी मिळण्यात अडचण येत असल्याचा दावा केला आहे.Mahayuti MLA Sanjay Gaikwad



    लोकप्रिय योजनांमुळे सरकार अडचणीत

    काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे मागील 10 महिन्यांपासून एकाही आमदाराला निधी मिळाला नाही. पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येत्या काळात राज्याची परिस्थिती सुधारण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

    सर्वच आमदारांना निधी मिळतो – सरनाईक

    दुसरीकडे, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमदारांना निधी मिळत नसल्याच्या दावात कोणतेही तथ्य नाही. आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जात आहे. तुम्ही माझ्या खात्याचे विचाराल तर आमचे डिपार्टमेंटचे जे एसटी डेपो किंवा एसटी स्टँड आहेत, त्यासाठी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निधीची व्यवस्था केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे आमदाराने केलेले विधान माझ्या तरी निदर्शनास आले नाही, असे सरनाईक म्हणाले. आमदार संजय गायकवाड व मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विरोधाभासी दाव्यांमुळे शिवसेनेतच या प्रकरणी मतमतांतरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    उल्लेखनीय बाब म्हणजे लाडकी बहीण सारख्या सरकारच्या लोकप्रिय योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली यापूर्वीही अनेक नेत्यांनी दिली आहे. पण त्यानंतरही ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यातील वित्तीय तूट इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की आता, राज्यातील सत्ताधारी गटातील आमदारांना देखील निधी मिळेना झालाय.आमच्यासारख्या विरोधी पक्षातील आमदारांना एक रुपयांचा देखील निधी हे सरकार देत नव्हते. आज त्यांच्याच सत्ताधारी गटातील आमदारांची अवस्था काय झाली आहे पाहा. 2020 साली महाविकास आघाडीचे सरकार असताना कोव्हिड काळात देखील राज्यावर 5 लाख 19 कोटींचे कर्ज होते.

    आज हे कर्ज 9 लाख 32 हजार कोटींच्या घरात पोहचले आहे. म्हणजे केवळ 5 वर्षात जवळपास 5 लाख कोटींचे कर्ज या सरकारने घेतले आहे. एकीकडे ठेकेदार लोकांचे 90 हजार कोटींचे देणे,दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला अधिभार,आणि तिसरीकडे राज्यावर वाढलेले अमाप कर्ज यांनी या मत चोरून सत्ता मिळवलेल्या सरकारला जेरीस आणले आहे हे नक्की, असे ते म्हणाले.

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad Claims No Funds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय- महाराष्ट्रात 15 हजार पोलिसांची भरती; विविध कर्ज योजनांतील जामीनदाराची अटही शिथिल

    Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन

    Ajit Pawar : 15 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांत मांसाहारावर बंदी; अजित पवार म्हणाले- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशी बंदी घालणे उचित नाही