विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील ५५६ पुनर्वसित सदनिकांचे आज (१४ ऑगस्ट) वितरण झाले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. Ajit Pawar
आपला मराठी माणूस इथेच राहिला पाहिजे. त्यामुळे ही घर कोणी १०-२० वर्ष विकू शकणार नाही अशी काही तरी सोय करा, अशी विनंती अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तसचं, महायुती सरकार आता धारावी प्रकल्पाचं कामही पूर्ण करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हणलंय. ही चाळ म्हणजे मिनी भारत आहे. इथल्या लोकांना मी इतकंच सांगेल कि आपला कष्टाचा ठेवा विकू नका, असंही ते म्हटले.
एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आपल्याला परत मुंबईत आणायचा आहे, त्यासाठी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प एक उत्तम उदाहरण असल्याचं म्हणलंय. आज खूप चांगला दिवस आहे. ५५६ सदनिकांचा वितरण समारंभ आज पार पडला. उद्या सगळ्यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवा, असं आवाहन त्यांनी केलं. तुम्ही आज चाळीतून टॉवरमध्ये जात आहात, हे महायुतीच यश आहे. तसचं ही चाळ पुढील १२ वर्ष मेन्टेनन्स फ्री असणार आहे. आमचा अजेंडा हा केवळ विकास हाच आहे. पुढच्या दीड वर्षात तुम्हाला मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. Ajit Pawar
पुढे त्यांनी मेट्रोच कामही स्पीडने केल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस मुखमंत्री असतांना मला डब्ब्यात पडलेलं एमएसआरडीसी खातं दिलं होतं. नंतर या खात्याने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला. महायुती सरकार मुंबई आणि एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे. स्टॅम्प ड्युटी आता फक्त १ टक्क्यावर आली आहे. लाडक्या बहिणीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, असंही ते यावेळी म्हटले.
या चाळीने स्वांतत्र्य चळवळही बघितली आहे
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाळीत काहींच्या ३-४ पिढ्या गेल्याचं सांगितलं. या चाळीने समाजिक, राजकीय आंदोलन बघितली आहेत. स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितली आहे. १०० वर्षांचा इतिहास पहिला तर या चाळीत अनेक कथा कहाण्या आहेत. त्यामुळे या चाळींचा पुनर्विकास व्हायला हवा असं आमचं म्हणणं होतं. बीडीडीमध्ये माझी एक सभा झाली होती. त्यावेळी मी इथल्या लोकांच्या घरी जाऊन ते काय परीस्थित राहतात हे बघितलं. इथली अवस्था झोपडपट्टी पेक्षाही वाईट होती. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर इथल्या मागण्या पूर्ण करण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. त्यासाठी येथील ९० वर्षाचं अतिक्रमण देखील हटवण्यात आलं. Ajit Pawar
Mahayuti government will complete Dharavi project; Ajit Pawar assures!
- महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांनी पाजळली “राजकीय “विद्वत्ता”; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!
- Semiconductor : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; सरकार 4,594 कोटी रुपये गुंतवणार
- Asim Munir : माजी अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले- असीम मुनीर सूट घालणारा लादेन; पाक लष्करप्रमुखांनी दिली होती अणुहल्ल्याची धमकी
- India China : पुढील महिन्यापासून भारत-चीनदरम्यान थेट विमानसेवा; अहवालात दावा- भारताने विमान कंपन्यांना तयारी करण्यास सांगितले