• Download App
    लोकसेवा आणि सुशासनासाठी महायुती सरकार कटिबद्ध - देवेंद्र फडणवीस Mahayuti Government Committed to Public Service and Good Governance Devendra Fadnavis

    लोकसेवा आणि सुशासनासाठी महायुती सरकार कटिबद्ध : देवेंद्र फडणवीस

    25 वर्षात रायगड जिल्हा महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल, असंही म्हणाले.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रायगड येथे महायुती सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा लोककल्याणकारी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील सुमारे 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटीच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले तसेच पनवेल महानगरपालिका सामूहिक मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे उद्गघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. Mahayuti Government Committed to Public Service and Good Governance Devendra Fadnavis

    कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार निरंजन डावकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, प्रशासनातील अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रायगड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राचा विकास मुंबईमुळे झाला. मात्र येत्या 25 वर्षात रायगड जिल्हा महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल. रायगड आणि नवी मुंबई ही देशाची डेटा कॅपिटल म्हणून उदयास आली आहेत. भारताच्या डेटा सेंटर क्षमतेपैकी 50 टक्के क्षमता या प्रदेशात तयार करण्यात आली आहे.

    आज, केंद्र आणि राज्य सरकार मिळून रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि गुंतवणुकीचे केंद्र बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने तयार करत आहेत. ज्यामध्ये विमानतळ, रस्ते बांधणी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, जेएनपीटी बंदर इत्यादी जागतिक दर्जाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.’

    याचबरोबर ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्‍यांना 1 रुपयामध्ये पीक विमा , भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांना बोनस आणि वार्षिक 12 हजारांची आर्थिक मदत अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

    समाजातील महिला, तरुण, ओबीसी, दलित, आदिवासी, शोषित, वंचित अशा सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. जनसेवेला प्राधान्य देऊन जनतेचा योग्य विकास करणे हे महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे.’ अशी माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.

    Mahayuti Government Committed to Public Service and Good Governance Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ