विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी “एक है तो सेफ है”, असा राजकीय नारा देत पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणार असल्याचा निर्वाळा दिला.
भाजप विधिमंडळ पक्षाने देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड केल्यानंतर फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले तिथून ते तिघेही एकाच गाडीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटायला राजभावनावर गेले एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांपुढे सादर केला अजित पवारांनी तशाच आशयाचे पत्र राज्यपालांना दिले महायुतीतील सर्व घटक पक्षांनी आपापल्या पाठिंब्याची पत्रे राज्यपालांना सादर केली. राज्यपालांनी उद्या सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करण्यास मान्यता दिली.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजभवनातच संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब आहे. आम्ही सगळे एकत्र बसून प्रत्येक निर्णय घेतो आणि इथून पुढेही घेऊ, असा निर्वाळा दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होतील, असा आशावाद व्यक्त केला, त्यावर आपण संध्याकाळपर्यंत निर्णय देऊ, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 9 दिवसांनी महायुतीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करताना राजकीय दृष्ट्या “एक है तो सेफ है”, हे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना जी राजकीय अडचण निर्माण झाली होती, ती देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून दूर झाली.
Mahayuti fully supports Devendra Fadnavis for chief ministership
महत्वाच्या बातम्या
- Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
- Defence संरक्षण अधिग्रहण परिषदेने 22 हजार कोटी रुपयांच्या पाच प्रस्तावांना दिली मंजुरी
- Eknath Shinde : एकीकडे एकनाथ शिंदेंची राजी – नाराजी; दुसरीकडे भाजपची हिंदू ऐक्याच्या नव्या राजकारणाची पायाभरणी!!
- Israeli mosques : इस्रायलच्या मशिदींमधून स्पीकर हटणार, पोलिसांना स्पीकर जप्त करण्याचे आदेश