• Download App
    Mahayuti formula, power distribution among themselves, no space for opposition महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला;

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!

    Mahayuti formula

    नाशिक : महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत, 2025 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापली राजकीय बांधबंदिस्ती सुरू केली, पण यातला महायुतीचा खरा फॉर्म्युला कुणीच सांगितला नाही, तो म्हणजे ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!, हा तो फॉर्म्युला आहे.Mahayuti formula, power distribution among themselves, no space for opposition

    महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष सैरभैर झालेत. ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र आले, तरी निवडणुकीत एकत्र येतील की नाही, याविषयी त्यांच्याच पक्षांमध्ये कुणाला गॅरंटी नाही. तसेही ठाकरे बंधूंचे ऐक्य सत्ताधारी भाजप पक्षातल्या चाणक्यांवर अवलंबून आहे. पण ठाकरे बंधू एक झाले, तरी त्याचा परिणाम भाजपवर होण्यापेक्षा महाविकास आघाडीवर होऊन ती आघाडी तुटून जाईल. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना एकत्र किंवा वायले – वायले लढावे लागेल. त्यामुळे तशीही महाविकास आघाडीची राजकीय गोचीच होईल.



    या पार्श्वभूमीवर जो काही राजकीय संघर्ष व्हायचा, तो महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये होईल, पण हा संघर्ष करताना देखील महायुतीला घटक पक्षांनी विशेषतः भाजपने जो फॉर्म्युला तयार केलाय, तो म्हणजे आपण एकत्र लढू किंवा एकमेकांच्या विरोधात लढू. पण निवडणूक अशी लढवू की, सगळा महाराष्ट्र आपसांतच वाटून घेऊ असा असणार आहे.

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्याच्या जागा जास्त, त्याचा महापौर असा फॉर्म्युला जाहीर केला. हा फॉर्म्युला बिलकुल नवा नाही. तसाही कुठल्या युतीचा किंवा आघाडीचा तोच फॉर्म्युला असतो. त्यामुळे त्यात जाहीर करण्यासारखी किंवा न जाहीर करण्यासारखे किंवा जाहीर न करण्यासारखे काही नाही.

    – स्पर्धा फक्त आपल्यातच ठेवा

    महायुतीने जाहीर न केलेला किंवा कधीही जाहीर न करणारा फॉर्म्युला असा की, भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात कितीही स्पर्धा लागू द्या, पण ही स्पर्धा आपापसांतच राहू द्या. ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना या स्पर्धेत शिरकावही करू देऊ नका. मुंबई, मुंबई परिसरातल्या सगळ्या महापालिका, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी सर्व क्षेत्रांवर ज्यांचे वर्चस्व आहे, ते टिकवून ठेवा. एखाद्या ठिकाणचे वर्चस्व घटणार असेल, तर मित्र पक्षाला तिथे संधी द्या. आणि सगळ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा शक्यतो महायुतीच्याच ताब्यात येऊ द्या. मग महायुतीत इतर कुणालाही प्रवेश द्या. पण त्यांच्यावर महायुतीचा शिक्का लावल्याशिवाय त्यांना निवडणुकीत उभं राहायची देखील संधी देऊ नका.

    याचा सरळ अर्थ असा की, महाराष्ट्र ठाकरे आणि पवार ब्रँडची चर्चा माध्यमांना आणि त्यांच्याच पक्षांमधल्या नेत्यांना करू द्या. त्यावर जी काय वातावरण निर्मिती करायची ती करू द्या, आपली निवडणूक व्यूहरचना अशी करा की, पण हे ब्रँड महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांमधून पुरते उतरवून ठेवा. हा महायुतीचा खरा फॉर्म्युला आहे, ज्याची चर्चा मराठी माध्यमांच्या आवाक्या पलीकडची आहे.

    Mahayuti formula, power distribution among themselves, no space for opposition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    राष्ट्रपतींच्या नियुक्तीने उज्ज्वल निकम, सदानंद मास्टर, मीनाक्षी जैन, हर्ष शांग्रीला राज्यसभेवर