विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mahayuti candidates विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पाच पैकी तीन जागांसाठी भाजपने काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.Mahayuti candidates
भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (18 मार्च) रोजी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख 27 मार्च आहे. मात्र, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार दिलेला नाही. कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्याने महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.
चंद्रकांत सूर्यवंशी 1992 पासून राजकारणात सक्रीय
दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकजून अनेक जण या जागेसाठी इच्छुक होते. मात्र, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत सूर्यवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रीय आहेत.
अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला आज सुरूवात झाली आहे. अजित पवार अर्थसंकल्पावर झालेल्या सर्वसाधारण चर्चेला आपले उत्तर देतील. त्यात ते विरोधकांनी केलेली टीका आपल्या युक्तिवादाने परतावून लावण्याचा प्रयत्न करतील. यावेळी ते भविष्यातील आपल्या योजनांवरही प्रकाश टाकण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?
भाजपा
1) संजय किणीकर- संभाजीनगर
2) दादाराव केचे- वर्धा
3) संदीप जोशी – नागपूर
शिवसेना
1) चंद्रकांत रघुवंशी- नंदुरबार
राष्ट्रवादी काँग्रेस
1) संजय खोडके
Mahayuti candidates announced for 5 Legislative Council seats; Chandrakant Raghuvanshi from Shiv Sena, 3 leaders from BJP get chance
महत्वाच्या बातम्या
- गुजरातेत बंद फ्लॅटमधून तब्बल ९५.५० किलो सोने जप्त, डीआरआय व एटीएसची संयुक्त कारवाई
- Nagpur औरंगजेब कबरीच्या समर्थकांकडून नागपुरात जाळपोळ, पोलिसांवरही दगडफेक; विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; मुख्यमंत्री + गडकरी यांचे शांततेचे आवाहन!!
- Western America : पश्चिम अमेरिकेत 26 वादळे, 34 जणांचा मृत्यू; 130 Kmph वेगाने धुळीचे वादळ; 10 कोटी लोक प्रभावित
- USA NSA Tulsi Gabbard : टेरिफ बद्दल ट्रम्प + मोदी यांच्यात थेट उच्चस्तरीय चर्चा; अमेरिका – भारत मध्यम मार्गी तोडगा काढण्याची आशा!!