• Download App
    महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डेटाबाबत ओबीसी समाजाची दिशाभूल केली, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप | The Focus India

    महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डेटाबाबत ओबीसी समाजाची दिशाभूल केली, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    भंडारा : नवीन एम्पेरिकल डेटा तयार करायचा होता. मात्र, या लोकांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली. केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. 2011 चा जनगणनेचा डेटा हा 2011 च्या जिल्हा परिषदेच्या कामाचा नव्हता. नवीन डेटा तयार करायचा होता. पण या सरकारनं ते काम केलं नाही.Mahavikas Aghadi government misleads OBC community over empirical data, alleges Chandrasekhar Bavankule

    महाविकास आघाडी सरकार फक्त खोटं बोलत असल्याची टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.ओबीसी समाजाचा एम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने तज्ज्ञांच्या मदतीने प्रश्नावली तयार केली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना बावनकुळे म्हणाले,



    आपण सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की तीन महिन्याच्या आत डेटा तयार करावा आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत.महाराष्ट्रातील इम्पेरीकल डाटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. चार महिन्यांत इम्पेरीकल डाटा गोळा करणं शक्य नाही. मंत्रिमंडळात याबाबत ठराव झालाय.

    कुठल्याही राज्यात इम्पेरीकल डाटा गोळा केला नाही. त्यामुळं वेळ वाढवून देण्याची आम्ही सर्वोच्च न्यायालयात मागणी करतोय. 17 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. केंद्र सरकार ओबीसीबाबत दुजाभाव करतोय, असा आरोप ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Mahavikas Aghadi government misleads OBC community over empirical data, alleges Chandrasekhar Bavankule

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात