- राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत.
- प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं.
- मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विशेष प्रतिनिधि
मुंबई : महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. Mahavikas Aghadi Government Decision of Multi-member ward structure for all Municipal Corporations
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत 3 सदस्यीय प्रभार पद्धत असेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय, तर नगरपंचायतीला 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे.
प्रभाग रचनेत बदल का?
आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.
Mahavikas Aghadi Government Decision of Multi-member ward structure for all Municipal Corporations
महत्त्वाच्या बातम्या
- रजनी पाटलांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न; काँग्रेसला कोणाकडून दगाफटक्याची भीती वाटतेय??
- शाहरुख खानच्या चित्रपट फॅनसाठी सर्वोच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला फटकारले, ठोठावला 15 हजारांचा दंड
- यूपी एटीएस खुलासा : धर्मांतराची देशव्यापी सिंडिकेट चालवल्याबद्दल मौलानाला अटक, बहरीनकडून ट्रस्टला मिळाले 1.5 कोटी रुपये
- कॅलिकत युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा ‘हुंडा घेणार नसल्याचा’ बॉंड