नाशिक : महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना त्यांचे वर्णन “महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री” असे केले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. पण ते फक्त फडणवीसांवर टीका करून थांबले नाहीत, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्याच आजच्या पत्रकार परिषदेत बांधल्या.
भाजपने अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून छळ छावणी त्यांचा छळ केला. त्यांच्यासारख्या नेत्याचे नेतृत्व कधी बहरू नये ते कधीही मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी भाजपनेच त्यांना तुरुंगात घालण्याचा डाव खेळला होता. त्यामुळे अजित पवार भाजपबरोबर राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नसते. ते महाविकास आघाडी बरोबर आले असते आणि राहिले असते तर मात्र नक्की मुख्यमंत्री झाले असते, असा दावा संजय राऊत यांनी केला.
– महाविकास आघाडी कडून सगळेच मुख्यमंत्री
पण संजय राऊत हे फक्त अजितदादांनाच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करून थांबले नाहीत. त्यांनी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना देखील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करून टाकले. या प्रत्येक नावासाठी त्यांनी वेगवेगळे तर्क दिले. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे हे सगळे शिवसेनेचे नेते होते. नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री केले. ते भाजपमध्ये गेल्यानंतर कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत. भाजपवाले त्यांना कधीच मुख्यमंत्री करणार नाहीत. एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले, कारण त्यांना शिवसेना फोडायची होती. पण आता भाजप एकनाथ शिंदेंना कधीच मुख्यमंत्री करणार नाही. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर शिंदेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल. नव्याने उमेदवारी करावी लागेल, असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला.
छगन भुजबळ आणि गणेश नाईक हे सुद्धा आमचे सहकारी होते. ते महाविकास आघाडीत राहिले असते, तर महाविकास आघाडी कडूनच मुख्यमंत्री झाले असते, असे संजय राऊत म्हणाले.
– विरोधी पक्षनेते पद मिळेना
एकीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ 46 आमदारांचे असल्यामुळे त्यांना विधानसभेतले साधे विरोधी पक्षनेते पद मिळवता आलेले नाही. असे असताना संजय राऊत मात्र महाविकास आघाडीतून मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या बांधून मोकळे झाले.
– शरद पवारांना पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून घुमजाव
राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून माघार घेतली. शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ते लगेच निवडून देऊ शकतील असे संजय राऊत म्हणाले होते पण आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला छेद दिल्यानंतर संजय राऊत यांना शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून माघार घ्यावी लागली. राज्यसभा निवडणुकीची चर्चा अजून सुरू आहे त्या निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सगळे चित्र स्पष्ट दिसेल, असे संजय राऊत पत्रकारांना म्हणाले.
Mahavikas Aghadi failed to get an opposition leader
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे गुणवर्णन करताना मुख्यमंत्र्यांना महाकवी भास आणि कवी पी. सावळाराम यांच्या काव्याची आठवण
- Kishtwar : किश्तवाडमध्ये 2 जैश दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांनी अतिरेक्यांचे तळ उडवले
- MSRTC : राज्य परिवहन मंडळाची घोषणा- आता ‘गाव तिथे एसटी’ नव्हे, ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’
- राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांचा दुसरा खोडा; INDI आघाडीचे नेतृत्व दुसऱ्या नेत्याकडे सोपवायची केली मागणी