• Download App
    Mahatma Phule महात्मा फुले ब्राह्मणांचे विरोधक नव्हते, ते फक्त ब्राह्मण्यवादाचे विरोधक, त्यांनी ब्राह्मणांच्या वाड्यात शाळा काढल्या!!

    Mahatma Phule : महात्मा फुले ब्राह्मणांचे विरोधक नव्हते, ते फक्त ब्राह्मण्यवादाचे विरोधक, त्यांनी ब्राह्मणांच्या वाड्यात शाळा काढल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : महात्मा फुले हे ब्राह्मण विरोधक नव्हते. ते फक्त ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. ब्राह्मणांपेक्षा आपल्या लोकांनी त्यांना जास्त विरोध केला. महात्मा फुलेंनी पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली, दुसरी शाळा चिपळूणकर यांच्या वाड्यात सुरू केली, तेही ब्राह्मण होते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या मुंबई नाका चौकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. Mahatma Phule smarak inauguration

    छगन भुजबळ म्हणाले, कुडाळहून पुतळे आणले, मागेपुढे पोलीस होते, तिथून दोन दिवसात आले त्यांचे पोलिसांचे आभार मानतो. 1951 साली बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिबा फुले यांच्या पुतळा नाशिकमध्ये उभारला आहे. 15 वर्ष मी बघत होतो, महाराजांचा पुतळा आहे, आंबेडकर यांचा आहे पण महात्मा फुलेंचा पुतळा नव्हता, अखेर जागा मिळाली. पुतळा कसा असावा ही सर्व संकल्पना आणि जबाबदारी समीर भुजबळ यांची आहे.  Mahatma Phule

    देशातील सर्वात मोठा अर्धपुतळा आहे, 18 फूट उंचीचे अर्ध पुतळे आहेत. महात्मा फुले याना जिवंतपणी आणि मृत्यूनंतर ही विरोध झाला. पुण्यात 1925 मध्ये पुतळा उभारणार होते त्याला काही कर्मठ लोकांनी विरोध केला. एक फुले होते त्यांनीही विरोध केला. त्यानंतर 44 वर्षांनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळा उभारण्यात आला.  Mahatma Phule

    छगन भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले कवियत्री होत्या. ब्राह्मणाच्या यशवंत नावाच्या मुलाला ज्योतिबा यांनी दत्तक घेतले, त्याला डॉक्टर केले. पुण्यात 1896/97 ला प्लेगची साथ आली. तेव्हा रोगी दिसला की इंग्रज त्याला उचलून न्यायचे पुढे कुठे तो दिसत नव्हता. सावित्रीबाई फुले त्यांचे उपचार करत होत्या. रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेग झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
    यापेक्षा मोठे समाजकार्य काय असते? असं म्हणत छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं महत्त्व स्पष्ट केलं.  Mahatma Phule

    फुले दांपत्य जगासाठी आदर्श

    एकनाथ शिंदे म्हणाल्या, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जगासाठी आदर्श होत्या. आतापर्यंतच्या इतिहासात अर्धपुतळा एवढा मोठा देशात पहिल्यांदा बघत आहोत. अतिशय कपलकतेने स्मारक उभे केले. एखादे काम हातात घेतले की ते तडीस नेण्याचे काम भुजबळ करत आहेत. पुतळे सर्वाना प्रेरणा देतील. त्यांच्या कार्याची उंची आपल्याला फूट पट्टीत मोजता येणार नाही. फुले दाम्पत्याचे काम सोन्याला फिके पडणारे आहे. सोन्या सारखे काम आहे. नायगाव इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला 100 कोटी रुपये मंजूर केले.

    Mahatma Phule smarak inauguration

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस