• Download App
    महाराष्ट्राच्या लेकीने भारताचा झेंडा फडकवला साता समुद्रापार ,आदितीने पतंगेने जिंकला 'मिस इंडिया वॉशिंग्टन'Maharashtra's Leki wins Indian flag overseas, Aditi wins 'Miss India Washington'

    महाराष्ट्राच्या लेकीने भारताचा झेंडा फडकवला साता समुद्रापार ,आदितीने पतंगेने जिंकला ‘मिस इंडिया वॉशिंग्टन’

    अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल येथे ही स्पर्धा पार पडली.तिला लहानपणापासून अभिनया व मॉडेलिंगची आवड आहे.Maharashtra’s Leki wins Indian flag overseas, Aditi wins ‘Miss India Washington’


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे पुण्याच्या आदिती पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ हा मानाचा किताब पटकावला आहे.आदितीने म्हणजेच महाराष्ट्राच्या लेकीने भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकवला आहे.आदिती ही मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल येथे ही स्पर्धा पार पडली.तिला लहानपणापासून अभिनया व मॉडेलिंगची आवड आहे.



    आदितेने या स्पर्धेत ‘बेस्ट स्माईल’चा किताब पटकावला आहे. तिच्या इन्स्टावर तिचे काही सुंदर फोटो पाहायला मिळतात.या फोटोंमधील तिच्या चेहऱ्यावरील हास्य लक्षवेधून घेते. कोरोना काळात आदितीने घरातून काम करून अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ स्पर्धेत भाग घेतला.

    यातील 22 स्पर्धकांमधून तिनं प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेट मधील होते. क्यूटेस्ट कपल सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरचे संक्रांतीचे स्वीटेस्ट फोटो ही एक स्टेट लेव्हल स्पर्धा होती.आता ती ऑगस्ट 2022 मध्ये नॅशनल लेव्हल ‘मिस इंडिया युएसए’ मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे.

    आदिती पतंगेचे शिक्षण

    आदितीने बारवी पर्यंतचे शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये घेतेले.त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तिथे आदितीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. यानंतर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू लागली.

    Maharashtra’s girls wins Indian flag overseas, Aditi wins ‘Miss India Washington’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल