नाशिक : भाजपा – शिवसेना युतीने मुंबई महापालिका जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव टाकत असल्याची फक्त माध्यमांतून चर्चा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र निर्धास्तपणे दावोसला रवाना!!, असेच राजकीय चित्र रविवारच्या सुरुवातीला दिसले.
– मराठी माध्यमांचे नावे
मुंबई महापालिकेत भाजपने 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्यानंतर मुंबईचे महापौर पद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी डाव टाकल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. मुंबईच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या हातखंडे आजमावल्याचे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे म्हणून मुंबईचे महापौर पद शिवसेनेला द्या, असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरलाय. भाजप वर दबाव आणण्यासाठी त्यांनी आपले 29 नगरसेवक हॉटेल ताज लँड मध्ये मुक्कामाला आणून ठेवलेत, असे दावे मराठी माध्यमांनी बातम्यांमधून केले. या बातम्यांना एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांनी कुठलीही पुष्टी दिली नाही, तरी केवळ सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी त्या बातम्या पुढे रेटल्या.
– मुख्यमंत्री दावोसला रवाना
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र निर्धास्तपणे मुंबईतून दावोसला रवाना झाले. त्यांनी स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंट करून फोटो शेअर करून तसे जाहीर केले. स्वित्झरलँड मधील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भाग देण्यासाठी फडणवीस तिथे गेले आहे विविध जागतिक कंपन्यांशी महाराष्ट्र सरकारचे करार तिथे होणार आहेत. महाराष्ट्रात या कंपन्यांकडून जास्तीत जास्त गुंतवणूक आणायची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची आहे, असा इरादा मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व्यक्त केला.
दावोसला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या महापौर पदावर स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य केले. मुंबईमध्ये भाजप – शिवसेना महायुतीचा महापौर होईल. भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते एकत्र बसून योग्य वेळी निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले फडणवीस यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जसाच्या तसा दुजोर दिला. पण माध्यमांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा सूत्रांच्या हवाल्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी एकनाथ शिंदे डाव टाकत असल्याच्या बातम्या चालविल्या.
– फडणवीस, शिंदेंचा खरा डाव
प्रत्यक्षात मुंबईचे महापौर पद असो किंवा अन्य 24 महापालिकांचे महापौर पद असो, किंवा या महापालिकांमधली सत्ता असो, यातली एकही महापालिका विरोधकांकडे जाऊ द्यायची नाही, असा चंग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बांधलाय त्यामुळे जे काही वाद होतील, ते आपापसांत मिटवू. विरोधकांना या वादामधून संधी द्यायची नाही, हेच दोघांनी ठरविले आहे. त्यासाठी दिल्लीतल्या महाशक्तीचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्यांच्यावर दबाव सुद्धा आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य कुठल्याही 24 महापालिकांमध्ये बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपचा आणि काही महापालिकांमध्ये शिवसेनेचा महापौर बसल्याखेरीस अन्य कुणाचाही महापौर बसणार नाही. हे राजकीय वास्तव आहे फक्त ते “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे मान्य करायला तयार नाहीत, एवढीच काय ती वस्तुस्थिती आहे.
Maharashtra’s blessings, travelling to Davos, Switzerland for WEF 2026
महत्वाच्या बातम्या
- Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू
- Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी
- ZP च्या निवडणुकीत अजितदादा कोणता वादा करणार??; काय मोफत देणार??; जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणता सल्ला देणार??
- Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ