प्रतिनिधी
मुंबई : आसाम मधील भीमाशंकर देवस्थाना संदर्भात तिथल्या सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली. त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग या विषयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी वाद निर्माण केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, आधी महाराष्ट्रातले उद्योग पळवत होते. आता तीर्थस्थळे देखील पळवत आहेत, असा आरोप करणारे ट्विट केले आहे. Maharashtra’s Bhimashankar ara Jyotirlinga middle place, Assam government has no claim
मात्र या संदर्भात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. मुनगंटीवार म्हणाले, की 2021 मध्येच केंद्र सरकारने देश देखो ही जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील भीमाशंकरचा बारा ज्योतिर्लिंग मध्ये उल्लेख आहे. आसाम मधल्या ज्योतिर्लिंगाविषयी जी जाहिरात प्रसिद्ध तिथल्या राज्य सरकारने केली आहे, त्याविषयी मी मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी आसाम मधले भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंग मधले आहे असा आमचा कोणताही दावा नाही, असा खुलासा केला आहे. भीमाशंकर हे आसाम मधले अनेक देवस्थानांपैकी ते एक देवस्थान आहे, तर महाराष्ट्रातील भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आहे, असा स्पष्ट खुलासा त्याच आधारे सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विट संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुनगंटीवार म्हणाले, की वाद निर्माण करणे हे विरोधकांचे काम आहे. पण इतिहास आणि धर्म या विषयावर इतिहास तज्ञ आणि धर्मशास्त्र्यांनीच बोलावे. राजकीय व्यक्तींचे ते काम नव्हे. पण राजकीय व्यक्तींना इतिहास या विषयात शाळेत किती गुण मिळतात हे पाहिला पाहिजे, असा खोचक टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
Maharashtra’s Bhimashankar ara Jyotirlinga middle place, Assam government has no claim
महत्वाच्या बातम्या
- BBC इन्कम टॅक्सचे सर्वेक्षण आजही जारी; BBC चा कर्मचाऱ्यांना मेल, पर्सनल इन्कमवर उत्तरे देऊ नका!!, बाकी सहकार्य करा; वर्क फ्रॉम होमही सुरू
- मुदतीपूर्वी राजीनामा दिलाच का??; सरकार 16 आमदारांमुळे नव्हे, उद्धव ठाकरेंमुळेच कोसळले; हरिश साळवेंचा युक्तिवाद
- मुस्लिमांना सैन्यात 30 % कोटा देण्याची नितीशकुमारांच्या मुस्लिम नेत्याची मागणी; नितीशकुमार मात्र नाराज!!