प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी त्याचे नेमके विश्लेषण पाहता त्यांनी केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते, अशी पोलखोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. MaharashtraFloods; package given by Thackeray – pawar government is actually 1500 cr only
देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक वीट करून ठाकरे पवार सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा “पंचनामाच” केला आहे.
ठाकरे – पवार सरकारने पँकेजमध्ये पूरग्रस्त पुनर्बांधणीचे ₹3000 कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ₹7000 कोटी असे 10 हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. ते अर्थातच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही 1500 कोटी रुपयांचीच दिसून येते.
राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा 2019 मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही.
या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही, हे मुद्दे फडणवीस यांनी ट्विटमध्ये मांडले आहेत.