• Download App
    श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार महाराष्ट्राचा बाप्पा; मुख्यमंत्र्यांनी भेट दिली मूर्ती!!|Maharashtra will sit in Panchmukhi Hanuman Temple in Lal Chowk, Srinagar; The Chief Minister visited the statue!!

    श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार महाराष्ट्राचा बाप्पा; मुख्यमंत्र्यांनी भेट दिली मूर्ती!!

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : महाराष्ट्राचा बाप्पा श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात गणरायाची मूर्ती त्या मंदिराला भेट दिली आहे. उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिथे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.Maharashtra will sit in Panchmukhi Hanuman Temple in Lal Chowk, Srinagar; The Chief Minister visited the statue!!

    ज्या श्रीनगरच्या लाल चौकात देशद्रोही नारे लगावले जायचे, जिथे दहशतवाद्यांच्या स्टेमगनच्या फैरींचे आवाज यायचे त्या लाल चौकात आता केवळ शांतताच नाही, तर गणेशोत्सवाचा उत्साह देखील मोठा दिसतो आहे. जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविल्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी लाल चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यांना गणेश मूर्ती भेट दिली.



     24 वर्षांपासून गणेशोत्सव

    लाल चौकातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्र्यांनी मराठी बांधवांच्या वतीने खास गणरायाची मूर्ती भेट म्हणून दिली. यंदा याच मूर्तीची मंडळाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

    यानिमित्ताने श्रीनगरच्या लाल चौकात गणेशचतुर्थी आधीच ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा’ जयघोष ऐकायला मिळाला, तसेच यावेळी मंदिर समितीच्या वतीने अत्यंत पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

    Maharashtra will sit in Panchmukhi Hanuman Temple in Lal Chowk, Srinagar; The Chief Minister visited the statue!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

    Nitesh Rane : सुप्रिया सुळेंच्या मटणावरील विधानावरून नितेश राणेंची टीका- दुसऱ्या धर्मासाठी असे भाषण केले तर चिरफाड होईल