• Download App
    Maharashtra vidhansabha Election Result 2024 जाती-पातीचा अतिरेक आणि फडणवीस द्वेष ठाकरे + पवार + काँग्रेसच्या महाविकास आघाडीला पडला महागात!!

    Maharashtra vidhansabha Election Result 2024 जाती-पातीचा अतिरेक आणि फडणवीस द्वेष ठाकरे + पवार + काँग्रेसच्या महाविकास आघाडीला पडला महागात!!

    नाशिक : महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे, एवढा जाती-पातीचा अतिरेक झाला आणि त्यातून फडणवीस द्वेष तयार करण्याचा प्रयत्न झाला. तोच नेमका शरद पवार + उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला महागात पडला. Maharashtra vidhansabha Election Result 2024

    मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाने सुरुवातीला सामाजिक रूप धारण केले, त्यावेळी त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला परंतु त्या पाठिंबाचे रूपांतर “मास्टर माईंड”ने राजकीय पाठिंब्यात करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच तो प्रयत्न फसला. फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या पुरोगामी नावाखाली “मास्टर माईंड”ने मराठवाडा आणि अन्य परिसरामध्ये जाती विद्वेष प्रचंड पसरवला. मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणे लावली. ही भांडणे उग्ररूप धारण करणार आणि महाराष्ट्र होरपळून काढणार, अशी अवस्था निर्माण झाली.

    परंतु प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालांमधून जे चित्र समोर आले, त्यातून महाराष्ट्राची विवेक बुद्धी शाबूत असून आपापल्या जातीपातींचा प्रत्येकाला अभिमान असला, तरी एकमेकांचा जातीचा द्वेष मान्य नाही, हेच या निमित्ताने अधोरेखित झाले.

    – राज ठाकरेंचे अचूक निदान

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीत जरी अपेक्षित यश मिळाले नसले तरी राज ठाकरे यांचे राजकीय निदान अचूक ठरले. महाराष्ट्रामध्ये जातीपातीचा अभिमान पहिल्यापासून होता आणि आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात जाती द्वेष पसरवला, असा आरोप त्यांनी सातत्याने केला. मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकीय स्वरूप तसे राहिले. त्यातून महाविकास आघाडीला तर काही फायदा झाला नाहीच, पण मराठवाड्यात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला.

    निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने बहुमताचा आकडा तर केव्हाच ओलांडला असून महाविकास आघाडी प्रचंड पिछाडीवर पडली आहे. महायुतीने डबल सेंच्युरी मारत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवल्याचे चित्र दिसत आहे.

    महायुती : 218

    भाजप 128, शिंदे सेना 55, अजितदादा राष्ट्रवादी 35

    महाविकास आघाडी : 50

    काँग्रेस 20, उबाठा सेना 17, शरद पवार राष्ट्रवादी 13

    अपक्ष आणि छोटे पक्ष 19

    एकूण 288 पैकी 287

    Maharashtra vidhansabha Election Result 2024

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!