• Download App
    भारतात साखर उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र अव्वल; एकूण निर्यातीत 40 % वाटा महाराष्ट्राचा Maharashtra tops in sugar production and export in India

    भारतात साखर उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र अव्वल; एकूण निर्यातीत 40 % वाटा महाराष्ट्राचा

    प्रतिनिधी

    मुंबई : संपूर्ण भारतात साखर उत्पादनाबरोबरच साखर निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. मागील 5 वर्षांत एकूण निर्यातीच्या 40 % हून अधिक साखरेची निर्यात महाराष्ट्रातून झाली आहे. २०२१-२२ या वर्षात देशातून १०० लाख मे.टन साखरेची निर्यात झाली असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ६३ लाख ६९ हजार मे. टन आहे. Maharashtra tops in sugar production and export in India

    देशाला ३४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून त्यात राज्याचा वाटा २० हजार कोटींचा आहे. यंदाच्या वर्षीही ५५ लाख मे.टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज आहे.

    निर्यातीत मागील वर्षात मोठी वाढ झाली असून २०१७-१८ मध्ये यातून ५१८० कोटीच महसूल मिळाला होता. तो २०२१-२२ मध्ये ३४ हजार कोटींवर गेला आहे.देशातून ११२ लाख टन, तर राज्यातून ६८ लाख टन साखर निर्यात झाली आहे. यातून ३४ हजार कोटींचे परकीय चलन मिळाले. उत्तर प्रदेशाने ११, तर कर्नाटकने १६ लाख मे. टन साखर निर्यात केली.

    राज्यातील साखर उत्पादन व निर्यातीसाठी बंदराची उपलब्धता यामुळे राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात झाली आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत १ कोटी मे.टन, तर त्यानंतर १२ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. भारत आता साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे.

    Maharashtra tops in sugar production and export in India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना