• Download App
    TET Paper Leak TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा दिलासा; फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार नाहीत, नव्याने नोंदणीचीही गरज नाही; 2-3 दिवसांत नव्या तारखेची घोषणा

    TET Paper Leak : TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा दिलासा; फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार नाहीत, नव्याने नोंदणीचीही गरज नाही; 2-3 दिवसांत नव्या तारखेची घोषणा

    TET Paper Leak

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : TET Paper Leak  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी फुटल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून लाखो उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी केली आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.TET Paper Leak

    भिवंडीत पेपर फुटल्याचा संशय; पोलिसांच्या धाडीत उघड झाला प्रकार

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी राज्यातील 1028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षेसाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 27 जूनच्या पहाटे भिवंडी परिसरात काही जणांकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.TET Paper Leak



    भिवंडी पोलिसांनी तातडीने धाड टाकून संबंधितांकडील कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासात संबंधितांकडे असलेले काही प्रश्न हे अधिकृत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा

    परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

    1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा

    राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.

    TET Paper Leak: No Fees or Re-registration for Re-exam, New Dates in 2-3 Days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

    Ketan Agrawal : पुणे हत्याकांडात दावा- केतनचे डोके चिरडलेले होते; रेस्क्यू टीमचा सदस्य म्हणाला- लोक रडत होते, पण सिया शांत होती; आई-वडिलांची चौकशी

    Mumbai Police : मुंबईतील मोहर्रमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूलचे वाटप; पुण्याच्या तरुणाला अटक, 14 हजार 900 गोळ्या जप्त; मोठा घातपात टळला