प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने अर्थात ईडीने पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच पुण्यात ९ ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात आता ईडीला कितीचे घबाड मिळाले असेल??, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. Maharashtra sugar mill case | Search operation by ED underway at the office of a close aide and business partner of former Maharashtra minister and NCP leader Hasan Mushrif
पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी छापे
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी. ए. जयेश दुधेडिया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापे घातले आहेत. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे.
ईडीच्या रडारवर
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक तसेच व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी मोठ्या प्रमाणात छापेमारी होत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली असून मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.
Maharashtra sugar mill case | Search operation by ED underway at the office of a close aide and business partner of former Maharashtra minister and NCP leader Hasan Mushrif
महत्वाच्या बातम्या
- रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…
- Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया
- CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!