सध्या राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्लीसह, महाराष्ट्रातही दररोज आढळत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही वेगवान हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. Maharashtra reports 803 new COVID19 cases and three death reported in the last 24 hours
महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा जास्त नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत.
याशिवाय मागील २४ तासांमध्ये ६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोना रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) हा ९८.१३ टक्के इतका आहे. तर राज्याचा मृत्यू दर १.८२ टक्के इतका आहे.
देशात करोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान २३०० हून अधिक प्रकरणे वाढली आहेत. कोरनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या (शुक्रवार) सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील करोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
Maharashtra reports 803 new COVID19 cases and three death reported in the last 24 hours
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!