विशेष प्रतिनिधी
मुबंई : गरिबीमुळे लाखो बालकांना आणि मातांनाही पोषक आहार मिळत नसल्यामुळे जन्मतः होणाऱ्या कुपोषणाचे प्रमाण भारतात मोठे आहे. कुपोषण ही समस्या बऱ्याच काळापासून भेडसावणारी एक मुख्य आणि प्रमुख समस्या आहे. कुपोषणामुळे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचे स्थान खाली गेलेय. 2020 मध्ये भारत 94 व्या स्थानावर होता तर आता 2021 मध्ये 101 व्या स्थानावर आहे. आताच द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील सर्वात जास्त कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे.
Maharashtra ranks first in the country in the number of malnourished children
महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २०११ मधील जनगणनेनुसार देशात एकूण ४६ कोटीपेक्षा अधिक मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिकुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल ९१ टक्के वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ही संख्या ९ लाख २७ हजार होती, ती ऑक्टोबर २०२१ पर्यंत १७ लाख ७६ हजार झाली आहे.
महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या ६ लाख १६ हजार इतकी असून देशात कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. यापैकी अतिकुपोषित बालकांची संख्या तब्बल ४ लाख ५८ हजार आहे, तर १ लाख ५७ हजार बालकं मध्यम कुपोषित आहेत. या यादीत बिहार दुसऱ्या स्थानावर असून, तिथं एकूण ४ लाख ७५ हजार बालकं कुपोषित आहेत, त्यामध्ये अतिकुपोषित बालकांची संख्या १ लाख ५२ हजार आहे, तर ३ लाख २४ हजार बालकं मध्यम कुपोषित आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये एकंदर ३ लाख २० हजार बालकं कुपोषित असून त्यापैकी १ लाख ६५ हजार बालकं अतिकुपोषित तर १ लाख ५५ हजार बालकं कुपोषित आहेत.
या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये कमी वजन आणि अॅनिमिया अशा आजारांनी ग्रस्त बालक आणि किशोरावस्थेतील महिलांसाठी पोषण अभियान देखील सुरू केले होते. तरीही ही समस्या भेडसावत आहे. आणि ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
कुपोषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजार होण्याचा धोका बालकांमध्ये अधिक असतो. त्याचप्रमाणे स्तनपान करणार्या मातांनादेखील पोषण आहार मिळणे आवश्यक असते. आणि यासंबंधी सरकारने जर लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत. अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ अनुपम सिबल यांनी म्हटले आहे.
Maharashtra ranks first in the country in the number of malnourished children
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल