• Download App
    Maharashtra Portfolio Allocation खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!

    खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दमवत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले यामध्ये एकनाथ शिंदेंना गृहनिर्माण आणि अजित पवारांकडे अर्थ खाते सोपविले, पण मंत्रिमंडळाची एकूण रचना आणि खातेवाटप पाहता त्यावर भाजपचेच वर्चस्व ठेवल्याचे दिसून येत आहे. Maharashtra Portfolio Allocation

    कारण महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, कौशल्य विकास, रोजगार, उद्योग, ओबीसी विकास, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान ही सगळी महत्त्वाची खाती भाजपच्याच मंत्र्यांकडे दिली आहेत. सगळ्यात मोठा वादाचा विषय राहिलेले गृह खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपविले असले तरी पुण्याचे पालकमंत्री पद मात्र त्यांच्याकडून काढून घेऊन ते चंद्रकांतदादा पाटलांना देण्यात येण्याची शक्यता आहे.

    खातेवाटपात एकनाथ शिंदे यांना देखील व्यवस्थित महत्त्व देण्यात आले असून त्यांचे आवडते नगर विकास खाते आणि गृहनिर्माण खाते खुद्द त्यांच्याकडे सोपविले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खात्याबरोबरच सहकार खात्याची जबाबदारी मिळाली आहे.

    मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे हे चौथ्या नंबरचे नेते बनले असून त्यांच्याकडे महसूल खाते सोपविले आहे चंद्रकांत दादांकडे वैद्यकीय शिक्षण तसेच विधिमंडळ कामकाज मंत्रालय तर गिरीश महाजनांकडे जलसंधारण आणि वेगवेगळ्या नदी खोऱ्यांचे खाते सोपविले आहे. आशिष शेलारंकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्रालय, तर अतुल अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास विकास आणि ऊर्जा ही खाती सोपविली आहेत. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार, तर कौशल्य विकास रोजगार आणि उद्योग ही खाती मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपविली आहेत.

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले मंत्री दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय आणि प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक खाते सोपविले आहे.

    अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वतः अजितदादांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क त्याचबरोबर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार ही महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत.

    देवेंद्र फडणवीस – गृह

    अजित पवार – अर्थ

    एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

    चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

    हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

    चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

    गणेश नाईक – वन मंत्री

    राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

    पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

    उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

    गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

    दादा भुसे – शालेय शिक्षण

    गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

    संजय राठोड – मृद व जलसंधारण

    धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

    मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

    जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

    अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

    अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

    आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

    शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

    माणिकराव कोकाटे – कृषी

    दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

    जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

    नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

    संजय सावकारे – कापड

    संजय शिरसाट – सामाजिक न्याय

    प्रताप सरनाईक – वाहतूक

    भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

    मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

    नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

    आकाश फुंडकर – कामगार

    बाबासाहेब पाटील – सहकार

    प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

    राज्यमंत्री (State Ministers )

    माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

    आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

    मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

    इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

    योगेश कदम – गृहराज्य शहर

    पंकज भोयर – गृहनिर्माण

    Maharashtra Portfolio Allocation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला