• Download App
    सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच संजय राऊत यांनी घातल्या लोकशाही संविधानाच्या घातल्या "अटी - शर्ती"!!Maharashtra political crisis: SC likely to pronounce verdict on pleas by Uddhav Thackeray, Shinde factions tomorrow

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच संजय राऊत यांनी घातल्या लोकशाही संविधानाच्या घातल्या “अटी – शर्ती”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सुप्रीम कोर्टात लागण्याचे अपेक्षा असताना तो प्रत्यक्ष निकाल लागण्यापूर्वीच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने लोकशाही संविधानाच्या “अटी – शर्तींचे” वाग्बाण सोडले आहेत. Maharashtra political crisis: SC likely to pronounce verdict on pleas by Uddhav Thackeray, Shinde factions tomorrow

    हा देश संविधानाच्या आधारे चालतो की नाही हे उद्याच्या निकालाच्या आधारे ठरेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

    ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सुप्रीम कोर्टाचे पाच सदस्यीय घटनापीठ देणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी तशा बातम्या दिल्या आहेत. मात्र ही सूत्रे नेमकी कोणती आणि घटनापीठापर्यंत त्यांची पोहोच कशी??, याविषयी मात्र मराठी माध्यमांनी मौन बाळगले आहे.

    तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या मुद्द्यावर राजकीय पंडित आणि राजकीय पक्ष यांनी आपापली आग्रही मते मांडली आहेत. यापैकीच एक मत संजय राऊत यांचे आहे.

    उद्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे सांगणे आत्ता उचित नाही. पण उद्याच्या निकालातून हे ठरेल की हा देश संविधान आणि कायद्याच्या नुसार चालतो की नाही. त्याचबरोबर हे देखील ठरेल, की या देशातली न्यायव्यवस्था कोणाच्या दबावाखाली काम करते की स्वतंत्रपणे काम करू शकते!! त्यामुळे आम्ही उद्याच्या निकालाची वाट बघत आहोत. त्यानंतर या देशात संविधान आणि कायदा चालतो की संविधान आणि कायद्याच्या अभावी पाकिस्तानची जशी हालत झाली आहे तसेच या देशात घडणार आहे??, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

    संजय राऊत यांच्या वक्तव्याचा खरा अर्थ

    संजय राऊत यांनी उघडपणे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधी एक वेगळा इशाराच दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला, तर देशात संविधान आणि कायद्याचे राज्य आहे, असे ठाकरे गट मान्य करेल आणि तोच निकाल ठाकरे गटाच्या विरोधात दिला अथवा निकालाचा बॉल विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टात टाकला तर ठाकरे गट ताबडतोब या देशात लोकशाही नाही. संविधान आणि कायद्याचे राज्य नाही, हे म्हणायला मोकळा होईल, असेच संजय राऊत आपल्या वक्तव्यातून सूचित करीत आहेत.

    शिवाय राऊत यांनी सांगितलेला नॅरेटिव्ह नवा देखील नाही. देशात 2014 नंतर काँग्रेस आणि काँग्रेसी विचारसरणीच्या राजवटी गेल्यानंतर देशात संविधान आणि कायदा धोक्यात आहे, असा धोशा विरोधी पक्षांनी आधीपासूनच लावला आहे. आता उद्याच्या सुप्रीम कोर्टात जर ठाकरे गटाला अनुकूल निकाल लागला, तर देशात आणि कायदा आणि संविधान टिकून असल्याचा “साक्षात्कार” विरोधकांना होईल आणि जर निकाल विरोधात गेला, तर संविधान आणि कायद्याचे या देशात राज्य उरले नाही. न्यायव्यवस्था देखील दबावाखाली काम करते, असा आरोप करायला विरोधक मोकळे होणार आहेत.

    Maharashtra political crisis: SC likely to pronounce verdict on pleas by Uddhav Thackeray, Shinde factions tomorrow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी