• Download App
    महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे "अण्णा नाईक", "पांडू" आणि "शेवंता" कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल । Maharashtra Police Transfers: Who are the leading decision makers "Anna Naik", "Pandu" and "Shevanta" ?; Ashish Shelar's sharp question

    महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रात 40 – 40 पोलिस अधिकाऱ्यांच्या एकदम बदल्या होतात आणि नंतर लगेच निर्णय फिरविण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारचा हा सगळा कारभार “रात्रीस खेळ चाले” सारखा चालला आहे. त्यामुळे यामध्ये निर्णय फिरवणारे महाविकास आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण आहेत??, असा खोचक सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला आहे. Maharashtra Police Transfers: Who are the leading decision makers “Anna Naik”, “Pandu” and “Shevanta” ?; Ashish Shelar’s sharp question

    मुंबईतील पोलखोल यात्रा, भोंगे, सुप्रिया सुळे यांना आलेली नोटीस तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्या या सर्व विषयांवर आशिष शेलार यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले. महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्यांमध्ये आधी घोटाळा होताच, पण या सरकारचा कारभार “रात्रीस खेळ चाले” असा चालला आहे. हे एका रात्रीत 40 – 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात नंतर अचानक निर्णय फिरवले जातात. याची महाराष्ट्राला अजिबात माहिती नसते. त्यामुळे निर्णय फिरवणारे मास्टर माईंड कोण आहेत??, महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या “रात्रीस खेळ चाले” सिरीयल मधले “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण आहेत??, हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असा खोचक असे खोचक उद्गार अशिष शेलार यांनी काढले.

    गेल्या 7 वर्षांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी भाजप विरोधात बोलत होते, तेव्हा त्यांना ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या नोटिसा आल्या नाहीत पण आजच का नोटीसा आल्या? नोटीसा आल्या की ते भाजपवर आगपाखड करतात. पण आपण चोरी केली नाही. आपला कोणताही दोष नाही असे ते कधीही म्हणत नाहीत. आपला दोष नाही असे म्हणण्याची हिंमत सुप्रिया सुळे किंवा महाविकास आघाडीचे नेते का दाखवत नाहीत??, असाही सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

    त्याचबरोबर मशिदींवरचे अनधिकृत भोंगे जर अधिकृत करण्याचा डाव ठाकरे – पवार सरकार आखत असेल तर भाजप त्याला कडाडून विरोध करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना का घाबरते?? त्यांनी हनुमान चालीसा म्हणणे देशद्रोह आहे का?? राणा दांपत्याला अडवण्यासाठी शिवसैनिक स्वतःच्याच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत आहेत. हनुमान चालीसा त्यांच्या हिंदुत्वात बसत नाही का??, असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतल्या पोल-खोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra Police Transfers : Who are the leading decision makers “Anna Naik”, “Pandu” and “Shevanta” ?; Ashish Shelar’s sharp question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस