विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Police महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.Maharashtra Police
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलिस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलिस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.Maharashtra Police
पदनाम : रिक्त पदांची संख्या
पोलिस शिपाई : 12399
पोलिस शिपाई चालक : 234
बॅण्डस्मन : 25
सशस्त्र पोलिस शिपाई : 2393
कारागृह शिपाई : 580
एकूण 15631
शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलिस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवण्यास तसेच ओएमआर आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आले आहे.
या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.450/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.350/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra Police Mega Recruitment for 15,631 Posts
महत्वाच्या बातम्या
- Agni-5 बीजिंग, शांघायही भारताच्या टप्यात, अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
- मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी सीएसडीएसचे संजय कुमार अडचणीत, नागपूर, नाशिकमध्ये गुन्हे दाखल
- Union Cabinet : कोटा ग्रीनफील्ड विमानतळाला केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; 1507 कोटी रुपयांचे बजेट दिले
- CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDA उमेदवार राधाकृष्णन यांचा अर्ज दाखल; मोदी पहिले प्रस्तावक