गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील टेक्केमेटा ते मर्दानटोला पहाडाच्या परिसरातील जंगलात शनिवारी उडालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. तीन पोलीस जवानही जखमी झाल्याचे समजते. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.गेल्या चार वर्षातली नक्षलवाद्यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून नक्षलवाद्यांच्या म्होरक्यासह २६ नक्षलवादी ठार केल्याचा हा पहिलाच एन्काऊंटर आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-६० युनिटच्या जवानांनी नियोजनबद्धरित्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहुल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या दिशेने कूच केल्याने ते हतबल झाले.
या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील शस्रसाठाही जप्त केला.
नक्षलवाद्यांचा म्होरक्याही मारला?
सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही नक्षलवादी म्होरकेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचाही मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या चार वर्षातील मोठ्या चकमकी
- २२ एप्रिल २०१८ : भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या जंगलात १६ नक्षलवादी ठार.
- २४ एप्रिल २०१८ : कसनासूर चकमकीमध्ये पळून जाणाऱ्या १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीपात्रात मिळाले.
- २५ एप्रिल २०१८ : भामरागड तालुक्यातील नैनेरच्या जंगलात ६ नक्षलवादी ठार झाले तर आधीच्या चकमकीतील दोन मृतदेह मिळाले.
- १९ ऑक्टोबर २०२० : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार.
- २१ मे २०२१ : एटापल्ली तालुक्यातील कोटमीच्या जंगलात १३ नक्षलवादी ठार.
- १३ नोव्हेंबर २०२१ – गडचिरोली, ग्यारापट्टी जंगलात २६ नक्षलवादी ठार.
Maharashtra police killed 26 Nakshlait’s in Gadchiroli near Chhatisgarh border
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…