• Download App
    जयंत पाटलांच्या ईडी चौकशी निमित्ताने राष्ट्रवादी - ठाकरे गटाचे "व्हिक्टीम कार्ड"; संजय राऊत यांची तर "मोठी" धमकी!! Maharashtra NCP President Jayant Patil reaches ED office.

    जयंत पाटलांच्या ईडी चौकशी निमित्ताने राष्ट्रवादी – ठाकरे गटाचे “व्हिक्टीम कार्ड”; संजय राऊत यांची तर “मोठी” धमकी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आयएल अँड एफएस गुंतवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशी करत आहे. मात्र या ईडी चौकशीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांना “व्हिक्टीम कार्ड” खेळण्याची संधी मिळाली आहे. ते खेळून घेत आहेत. जयंत पाटलांनी ईडी चौकशीच्या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येऊ नका, असे आवाहन केले होते. पण तरीही जयंत पाटील समर्थक ईडी कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. ईडीचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या मागेच आहे. Maharashtra NCP President Jayant Patil reaches ED office.

    त्याचबरोबर जयंत पाटलांच्या समर्थनासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील समोर आले. जयंत पाटील भाजपबरोबर गेले नाहीत. खरं म्हणजे ते भाजपबरोबर गेले असते तर त्या त्यांच्याकडच्या लॉन्ड्रीत जयंत पाटील व्यवस्थित धुवून स्वच्छ झाले असते, असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

    तर त्यापुढे जाऊन संजय राऊत यांनी आमची सत्ता येऊ द्या, मग सांगतो 2024 नंतर ईडी कार्यालयात कुणाकुणाला चौकशीसाठी पाठवायचे ते, अशी धमकी भरली भाषा वापरली. जयंत पाटील खमक्या मनाचे आहेत ते ईडी चौकशीला घाबरणार नाहीत अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यातले ऐक्य दिसले. पण ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या टेबलवर तसेच राहणार का??, हा सवालही या निमित्ताने तयार झाला आहे.

    Maharashtra NCP President Jayant Patil reaches ED office.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक