औरंगाबाद येथे एक मे राेजीच्या सभेस जाण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावरील निवासस्थानी आगमन झाले.
विशेष प्रतिनिधी
पुणे – औरंगाबाद येथे एक मे राेजीच्या सभेस जाण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावरील निवासस्थानी आगमन झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे औरंगाबादच्या सभेस जाण्याकरिता जय्यत तयारी केली आहे. Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare will going to Aurangabad Saturday morning with 500 vehicals tafa
शनिवारी सकाळी ठाकरे औरंगाबादला रवाना हाेण्यापूर्वी १०० ते १५० गुरुजींच्या उपस्थितीत त्यांना शुभाशीर्वाद दिले जाणार आहे. त्यानंतर सुमारे ५०० गाडयांच्या ताफ्यात राज ठाकरे औरंगाबादला रवाना हाेणार आहे.
शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळाे यासाठी गुरुजी पूजा करणार आहे. पुजा झाल्यानंतर ते शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादकडे कार्यकर्त्यां साेबत रवाना हाेणार आहे. वाटेत वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळास ते भेट देवून दर्शन घेणार आहे.
दरम्यान, तीन मे राेजी पर्यंत राज्यातील भाेंगे उतरविण्यात यावे असा अलटीमेटम मनसेने दिला हाेता तसेच राज्यभरात आरत्यांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. यादृष्टीने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आरती कार्यक्रमात सहभागी हाेण्यास समर्थता दर्शवली
असल्याचे सांगत मनसेचे पदाधिकारी अजय शिंदे म्हणाले, संघ परिवाराशी निगडित अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी वातावरण तयार केले असून औरंगाबाद येथील सभेला पुण्यातून १० ते १५ हजारजण जातील अशी अपेक्षा आहे.
Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare will going to Aurangabad Saturday morning with 500 vehicals tafa
महत्त्वाच्या बातम्या
- कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या पटियालात खलिस्तानी समर्थकांना शिवसैनिक भिडले!!; दगडफेक, तलवारी नाचवल्या, पोलिसांचा गोळीबार
- Raj Thackeray : संभाजीनगर सभेच्या “यशस्वीतेसाठी” सर्व विरोधकांचा केवढा तो “आटापिटा”…!!
- AC local : ऐन उन्हाळ्यात केंद्राचा दिलासा; मुंबईत एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 % कपात!!
- रुपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल